शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रदिनी फडकणार वेगळ्या विदर्भाचा झेंडा

By admin | Updated: April 30, 2015 01:22 IST

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भ कनेक्ट आणि विदर्भवादी संस्थांच्या वतीने १ मे रोजी स्वतंत्र विदर्भाचा ध्वज फडकविला जाणार आहे.

चंद्रपूर : स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भ कनेक्ट आणि विदर्भवादी संस्थांच्या वतीने १ मे रोजी स्वतंत्र विदर्भाचा ध्वज फडकविला जाणार आहे. विदर्भातील सर्व जिल्हा मुख्यालयी हे ध्वजारोहण होणार आहे. या अंतर्गत चंद्रपुरातील जनता महाविद्यालयाच्या प्रांगणात १ मे रोजी सकाळी ९ वाजता विदर्भाचा ध्वज फडकविला जाणार आहे.विदर्भ कनेक्टच्या पुढाकारात झालेल्या या पत्रकारपरिषदेला चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोक जीवतोडे, विदर्भ कनेक्टचे जिल्हाध्यक्ष बंडू धोतरे, अ‍ॅड. विजय मोगरे, विजय चंदावार आणि डॉ गोपाल मुंधडा प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले, आपली चळवळ अहिंसावादी असून लोकांमध्ये जागृती करणे आणि युवा वर्गात विदर्भ राज्याच्या मागणीसंदर्भात महत्व पटवून देण्यासाठी हा प्रयत्न आहे. वेगळे विदर्भ राज्य होणे ही काळाची गरज असल्याने हा लढा नेहमीच सुरू राहील, त्यात आपला सदैव सहभाग राहील, असे ते म्हणाले. अ‍ॅड. विजय मोगरे म्हणाले, जनतेचा दबाव राज्यकर्त्यांवर वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व जिल्हा मुख्यालयी होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमांतर्गत चंद्रपुरातही हा उपक्रम राबविला जात आहे. ही चळवळ अधिक सशक्त व्हावी यासाठी विद्यार्थी, प्राध्यापक, संस्थाचालक, कामगार आदी वर्गाला हाताशी घेऊन अहिंसेच्या मार्गाने लढा उभारला आहे. यापूर्वी ज्येष्ठ नागरिक संघाने घेतलेल्या जनमत चाचणीत ९७ टक्के कौल विदर्भाच्या बाजूने पडला होता. यावरून वेगळा विदर्भ व्हावा ही जनतेचीही इच्छा आहे, हे स्पष्ट होते, असेही ते म्हणाले. ध्वजारोहणानंतर उपस्थितांना विदर्भ राज्यनिर्मीतीसाठी शपथ दिली जाणार आहे. विदर्भ ही सर्वांची अस्मिता असल्याने नागरिकांनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार परिषदेतून करण्यात आले.सर्व विदर्भवादी नेते आंदोलनात एकत्र का येत नाहीत या प्रश्नावर ते म्हणाले, सागरात पोहचायचे असले तरी नद्या वेगवेगळ्या असतात. उद्देश मात्र एकच असतो. चळवळी वेगवेगळा मार्गाने वाढल्या तर त्याचा आंदोलनालाच फायदा आहे, असे ते म्हणाले. महाराष्ट्रदिनी हे ध्वजारोहण ठेवणे याचा अर्थ महाराष्ट्राला विरोध आहे असे नव्हे, तर विदर्भाची मागणी प्रदर्शित करण्याचा हाच योग्य दिवस असल्याने आणि जनतेची मागणी सरकारच्या निदर्शनास येण्याच्या दृष्टीने १ मे रोजी ध्वजारोहण होणार असल्याचे यावेळी अ‍ॅड. मोगरे आणि विजय चंदावार यांनी स्पष्ट केले. या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी शहरात बॅनर पोष्टर लावण्यात आले आहेत. जनजागृतीसाठी कार्यकर्तेही झटत आहेत. पत्रकार परिषदेला प्राचार्य एम. सुभाष, प्राचार्य प्रभू चोथवे, प्रा. श्याम धोपटे, डॉ, योगेश दुधपचारे, प्रशांत आर्वे, सुधाकर अडबाले, प्रा. कमलाकर धानोरकर, प्रा. जुगलकिशोर सोमानी, प्रा. पृथ्वीराज खिंची आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)