शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

धाडधाड... गोळ्या सुटताच एकच पळापळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:33 IST

चंद्रपूर : दुपारी सुमारे पावणे तीनची वेळ...लोक दुकानांमध्ये येत-जात होते. सर्वत्र हसत खेळत वातावरण...कुणी चर्चेत गुंतलेले तर चहा ...

चंद्रपूर : दुपारी सुमारे पावणे तीनची वेळ...लोक दुकानांमध्ये येत-जात होते. सर्वत्र हसत खेळत वातावरण...कुणी चर्चेत गुंतलेले तर चहा परीवर कुणाच्या हातात चहाचा प्याला होता. कुणाच्याही ध्यानीमनी नसताना अचानक बंदुकीतून धाडधाड गोळ्या सुटल्याचा आवाज येताच सारे वातावरणच क्षणात बदलून गेले. एक बुरखाधारी एका हातात पिस्तूल घेऊन गोळ्या झाडत एका युवकाच्या मागे धावत होता. हे चित्रपटात दिसणारे दृश्य प्रत्यक्षात बघताना अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला. आपल्यालाही गोळी लागेल... या भीतीने जो तो मिळेल त्या दिशेने पळत होता. काही क्षणात घडलेल्या या थराराने नेहमी हसत खेळत असलेला परिसर एकाएकी दहशतीत गेला. ज्यांनी ही घटना आखो देखी बघितली त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. शहराच्या गजबजलेल्या रघुवंशी काॅम्प्लेक्स परिसरात अशी घटना घडेल हा विचार कोणीही केलेला नव्हता...ही घटना चंद्रपूरकरांना दहशतीत नेणारी असल्याच्या भीतीयुक्त प्रतिक्रिया सर्वत्र उमटू लागल्या.

रघुवंशी काॅम्प्लेक्समध्ये अनेक दुकाने आहेत. बाजूलाच धनराज प्लाझा. येथेही गर्दी असते. या ठिकाणी दररोज हजारांवर नागरिकांची खरेदीसाठी ये-जा असतात. चंद्रपुरातील अतिशय सुरक्षित परिसर म्हणून मनात भीती न बाळगता नागरिक बिनधास्त वावरत असतात. बाजूला लागूनच आझाद गार्डन आहे. या ठिकाणी दररोज शहरातील कानाकोपऱ्यातील नागरिक सकाळी फिरायला येतात. शेकडो नागरिक व्यायाम करीत असतात. बाजूलाच एक पानटपरी आहे. या टपरीवर अनेकजण सकाळचा चहा घेतात. यावेळी शहरातील महत्त्वपूर्ण घडामोडींवर गप्पाही रंगतात. पहाटेपासूनच हा परिसर गजबजलेला असतो. या ठिकाणी हत्येचा कट रचला जातो. ही बाब चंद्रपूरकरांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण करणारी ठरली आहे. आरोपी गोळीबार करीत सुटला असता या परिसराची सुरक्षा सांभा‌ळत असलेल्या केसर नावाच्या व्यक्तीचा चिमुकला तेथे नेहमीप्रमाणे फिरत होता. तो आरोपीला आडवा आला होता. सुदैवाने त्याला गोळी लागली नाही. या घटनेने चंद्रपूरकर चांगलेच हादरले आहेत.

बल्लारपूरची वाटचाल पुन्हा गँगवाॅरकडे...

बल्लारपूर शहर एकेकाळी गँगवाॅरसाठी विदर्भात कुप्रसिद्ध होते. रात्री-दिवसाही हातात तलवारी घेऊन गुंड एकमेकांच्या मागे धावतानाचे प्रकार नेहमीचेच झाले होते. येथील गुंडांची सर्वत्र दहशत होती. कोणी-कोणाला मारत असले तरी मधात कोणी पडत नव्हता. वेकोलिचा परिसरही गुंडांच्या दहशतीत होता. कालांतराने हे गुंड आपसातच लढून संपले. तेव्हापासून ही दहशत काही प्रमाणात कमी झाली. मात्र गेल्या काही वर्षांपासून पुन्हा काही गुंड आपली दहशत गाजवू लागले. यातून सुरज बहुरिया हत्याकांड घडले आणि येथून बल्लारपुरात गँगवाॅरने पुन्हा डोके वर काढल्याचे बोलले जात आहे.