शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूरसाठी सव्वाशे कोटींची विकास योजना

By admin | Updated: November 6, 2014 22:53 IST

निवडणुकीत आम्ही जनतेला जी आश्वासन देतो, ती पूर्ण करतो. ‘प्राण जाये पर वचन न जाये’ हे आमचं ब्रिदवाक्य आहे. आमच्या पक्षाची सत्ता आल्यास बल्लारपूरचा सर्वांगीण विकास करू,

बल्लारपूर : निवडणुकीत आम्ही जनतेला जी आश्वासन देतो, ती पूर्ण करतो. ‘प्राण जाये पर वचन न जाये’ हे आमचं ब्रिदवाक्य आहे. आमच्या पक्षाची सत्ता आल्यास बल्लारपूरचा सर्वांगीण विकास करू, असे आश्वासन येथील जनतेला दिले होते. सव्वाशे कोटी रुपये बल्लारपूरच्या विविध विकास कार्याला लावून ते आश्वासन नक्कीच पूर्ण करू, अशी ग्वाही राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथील जनतेला मंगळवारी दिली. ना. मुनगंटीवार यांचे येथे स्वागत करण्यात आले. स्थानिक महात्मा गांधी पुतळ्याजवळ झालेल्या स्वागत समारंभात ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरुनुले, मुनगंटीवार यांच्या सहधर्मचारिणी सपना मुनगंटीवार, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष हरिष शर्मा, शहर अध्यक्ष शिवचंद द्विवेदी, जिल्हा उपाध्यक्ष अजय दुबे, महिला आघाडीच्या रेणूका दुधे, रामधन सोमानी, जगदीश गहेरवार, प्रमोद कडू, समीर केने, निलेश खरवडे, अशोक गुप्ता, देवनारायण चौहान इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. हार घालून मुनगंटीवार यांचे स्वागत करण्यात आले. मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात बल्लारपूर तालुक्यातील समस्यांसोबतच, दारुबंदी, स्वतंत्र विदर्भ, टोलनाका, औद्योगिक प्रश्न, पर्यावरण या विषयावरही भरभरुन बोलले. या साऱ्या समस्या प्राधान्यक्रमाने आम्ही नक्कीच सोडवू, त्याला थोडा अवधी लागेल. तोपर्यंत आमच्यावर विश्वास ठेवून धीर धरा, असा सबुरीचा सल्लाही त्यांनी दिला. आघाडी सरकारने पैशाची वारेमाप उधळपट्टी करुन राज्याची तिजोरी रिकामी केली. आम्हाला काटकसर करुन ती तिजोरी भरावयाची आहे. येथील मतदारांनी मला आमदार बनविले. मुख्यमंत्र्यांनी मंत्री बनवून माझ्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. राज्याच्या तिजोरीची चाबी सांभाळत सहकारी मंत्री व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने राज्याचा विकास करायचा आहे. कामगारांवर अन्याय होऊ नये, अशी औद्योगिक ध्येय धोरण ठरवून ती राबवायची आहेत. राज्याचा चेहरा मोहरा बदलायचा आहे, ग्रामीण भागाचाही विकास साधायचा आहे, असे शेवटी ते म्हणाले. (तालुका प्रतिनिधी)