शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

नागभीड येथे बांधकाम खात्याचे विभागीय कार्यालय

By admin | Updated: March 18, 2016 01:02 IST

येथे मंजूर झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागीय कार्यालयाच्या इमारतीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

इमारतीसाठी तीन कोटींचा निधी : मोठ्या कार्यालयाची प्रथमच उभारणीनागभीड : येथे मंजूर झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागीय कार्यालयाच्या इमारतीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या इमारतीसाठी ३ कोटी ११ लाख रुपयाचा निधी मंजूर झाला असून १५ मार्च रोजी ही मान्यता मिळाली.सार्वजनिक बांधकाम विभागात वाढलेल्या कामांची व्याप्ती तसेच चंद्रपूरपासून ब्रह्मपुरी, नागभीड, चिमूर आणि सिंदेवाहीचे अंतर लक्षात घेवून चंद्रपूर येथील सां. बा. विभागाचे विभाजन करण्यात यावे व नागभीड येथे विभागीय कार्यालय स्थापन करण्यात यावे, अशी फार जुनी मागणी होती. चिमूर-नागभीड विधानसभा मतदार संघातून आमदार कीर्तीकुमार भांगडिया निवडून आल्यानंतर त्यांनी या मागणीचा पाठपुरावा केला आणि त्याचे फलीत म्हणून सहा महिन्यांपूर्वीच या विभागाला मान्यता देण्यात आली होती.या मान्यतेनंतर आता इमारतीच्या बांधकामालाही मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. विभागीय कार्यालयासोबतच उपविभागीय कार्यालयाचे सुद्धा बांधकाम होणार आहे. यासाठी ३ कोटी १० लाख ८६ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी कोणत्या हेडवर किती खर्च करायचा याच्या अटी आणि शर्ती सुद्धा आखून देण्यात आल्या आहेत. या अटी आणि शर्तीनुसार मुख्य इमारत आणि इतर स्थापत्य कामे २ कोटी १९ लाख १२ हजार ६५० रुपये, आकस्मिक खर्च ८ लाख ७६ हजार रुपये, अंतर्गत विद्युतीकरण १० लाख ९५ हजार रुपये, बाह्य पाणी पुरवठा व मलनिस्सारण १० लाख ९५ हजार, गार्डनिंग व जमीन सुधारणा ५ लाख रुपये, मोटार शेड १० लाख रुपये, बाह्यविद्युतीकरण १३ लाख १५ हजार रुपये, पंप हाऊस ३ लाख रुपये, रेन वॉटर हार्वेस्टींग ३ लाख रुपये, अग्नीशमण यंत्रणा ५ लाख रुपये आणि भाववाढीवर २१ लाख ९१ हजार रुपये राखून ठेवण्यात आले आहेत. (तालुका प्रतिनिधी)इमारतीचे बांधकाम सुरु करण्यापूर्वी कोणती काळजी घेण्यात यावी, यासंदर्भात अनेक मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांपैकी अर्थसंकल्पात तरतुद झाल्याशिवाय प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात येवू नये, या एका सूचनेचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे या निधीचा अर्थसंकल्पात केव्हा समावेश होतो, याकडे लक्ष वेधून राहणार आहे.