शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची वाहने टोलमुक्त करण्याची मागणी

By admin | Updated: March 27, 2015 00:51 IST

लोकप्रतिनिधींच्या व शासकीय वाहनांना ज्याप्रमाणे महामार्गावरील टोलनाक्यांवर संपूर्ण सवलत दिल्या जाते,

भद्रावती : लोकप्रतिनिधींच्या व शासकीय वाहनांना ज्याप्रमाणे महामार्गावरील टोलनाक्यांवर संपूर्ण सवलत दिल्या जाते, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या धान्याने भरलेल्या वाहनाला टोल फ्री करण्यात यावे, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते बाबा आस्वले यांनी केली आहे.महाराष्ट्र राज्य हे टोल राज्य झाले आहे. राज्याच्या विकासाअंतर्गत मोठमोठे महामार्ग बांधण्यात आले आणि या महामार्गावर दशकानुदशके चालणारे टोल नाके उभारण्यात आले. सरासरी एका व्यक्तीचे अर्धेअधिक आयुष्य वाहनाकरिता रस्त्याचा टोलटॅक्स देण्यात जाते. यात आमदार-खासदार यासह शसाकीय वाहनांना टॅक्स फ्री करण्यात आले आहे. वरून हे लोकप्रतिनिधी टोलनाक्यावर स्वत:चे ओळखपत्र दाखविण्याविरोधात आवाज उठवितात. अशा परिस्थितीत संपूर्ण समाजाचा पोशिंदा असलेला शेतकरी मात्र निसर्ग, शासकीय योजना, शेतपिकाला रास्त भाव, दुष्काळ यात सदैव पिसलेला असतो. त्याच्यासाठी कोणताच टॅक्स माफ नाही म्हणून किमान शेतकरी शेतामधून बाजारात शेतपिकाने भरलेले वाहन घेवून जाताना रस्त्यात पडणाऱ्या टोल नाक्यावर त्याच्या वाहनाला टॅक्स फ्री करण्यात यावे. यामुळे शेतकऱ्याला दिलासा मिळेल व टोलनाका, दलाल, अडते, व्यापारी, खरेदीसाठी शासकीय दिरंगाई अशा अनेक लुटीमध्ये किमान टोल नाक्यावर बसणाऱ्या भुर्दंडातून तरी त्याची सुटका होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकविलेल्या धान्याने भरलेल्या वाहनांसाठी कोणत्याही प्रकारचा टोल लावण्यात येऊ नये, अशी मागणी मागणी बाबा आस्वले यांनी केलेली आहे.सोबतच वाहन खरेदी करताना आर.टी.ओ. कार्यालयाद्वारे लावण्यात येणारा टॅक्स व पेट्रोलचे दर ठरविताना रस्ते विकासाबाबत लावण्यात येणारा करण्यात येणारा जादा कर हे दोन टॅक्स देवूनच वाहन रस्त्यावर उतरते. मग पुन्हा रस्ते विकासाच्या नाववर टोक टॅक्सची वसुली कशासाठी, असा प्रश्नही बाबा आस्वले यांनी विचारला आहे. (प्रतिनिधी)