शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

रोजंदारी वनकामगारांना न्याय देण्याची मागणी

By admin | Updated: November 16, 2015 00:51 IST

रोजंदारी वनकामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आनंद भवन भानापेठ येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी वनकामारांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली.

चंद्रपूर : रोजंदारी वनकामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आनंद भवन भानापेठ येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी वनकामारांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली.राजेश पिंजरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ वन कामगार संघटनेचे अध्यक्ष दहीवडे तसेच वामन बुटले उपस्थित होते.दिर्घकाळ रोजंदारीने काम करणाऱ्या वन कामगारांना कायम करण्यात यावे, या मागणीसाठी शिष्टमंडळाच्या वतीने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आले. तसेच आपण मेळाव्याला भेट द्यावी अशी विनंती त्यांना करण्यात आली. त्यांनी विनंती मान्य केली व प्रत्यक्षात आनंद भवन भानापेठ येथे उपस्थित झाले. प्रास्ताविक भाषणात दहीवडे म्हणाले, येथे आलेले सर्व कामगार गेल्या आठ वर्षापेक्षा जास्त कार्यकाळापासून काम करीत असले तरी वर्षातून २४० दिवस कोणत्याही कामगारांचे पुर्ण झाले नाही. ९० दिवस होताच या कामगारांच्या नावावर पगार न काढता कामगारांच्या ऐवजी भावाच्या नावावर तर वडिलांच्या नावावर पगार काढण्यात येतो. काम एकाने करायचे आणि पगार दुसऱ्याच्या नावावर काढायचा, ही प्रथा तात्काळ बंद झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले, हा खरोखरच कामगारावर अन्याय आहे. हा कामगारांच्या जिवनाशी खेळ आहे. याकडे आपण स्वत: लक्ष देऊ आणि कामगारांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. कार्यक्रमाचे संचालन सचिन झाडे यांनी केले. आभार विठ्ठल पवार यांनी मानले. मेळावा यशस्वी करण्यासाठी नितेश टोंगे, विनोद सांगोळे, सुभाष बोरूले, भानुदास चव्हाण, विलास मारकवार आदींनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)