हुतात्‍मा स्‍मारकाच्या नूतनीकरणाचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:38 IST2021-02-05T07:38:54+5:302021-02-05T07:38:54+5:30

चंद्रपूर : शहरातील हुतात्‍मा स्‍मारकाच्‍या नूतनीकरणाचे लोकार्पण माजी अर्थमंत्री तथा लोकलेखा समितीचे प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार ...

Dedication of Renovation of Martyrs' Memorial | हुतात्‍मा स्‍मारकाच्या नूतनीकरणाचे लोकार्पण

हुतात्‍मा स्‍मारकाच्या नूतनीकरणाचे लोकार्पण

चंद्रपूर : शहरातील हुतात्‍मा स्‍मारकाच्‍या नूतनीकरणाचे लोकार्पण माजी अर्थमंत्री तथा लोकलेखा समितीचे प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडले.

भारतभूमीला स्‍वातंत्र्य मिळवून देण्‍यासाठी ज्‍या शूरवीरांनी हसतहसत आपल्‍या प्राणांचे बलिदान दिले अशा शूरवीरांच्‍या, हुतात्‍म्‍यांच्‍या स्‍मारकांच्‍या दुरुस्‍ती व नूतनीकरणासाठी अर्थमंत्री असताना सन २०१५-१६ च्‍या अर्थसंकल्‍पात निधी उपलब्‍ध करण्‍याची घोषणा केली होती. हा विषय सामान्‍य प्रशासन विभागाकडे होता. वारंवार बैठका घेऊन याचा पाठपुरावा केला. हुतात्‍मा स्‍मारकांसाठी निधी उपलब्‍ध करून दिला. जाज्‍वल्‍य देशभक्‍तीचे स्‍फूलिंग चेतवणाऱ्या या हुतात्‍मा स्‍मारकाचे नूतनीकरण करण्‍याच्‍या एकूणच प्रक्रियेत योगदान देऊ शकलो, याचा अभिमान व आनंद आहे. असे प्रतिपादन यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. यावेळी महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, मनपा सभागृह नेते संदीप आवारी, झोन सभापती प्रशांत चौधरी, प्रभागाचे नगरसेवक देवानंद वाढई, सुनीता लोढीया, नगरसेवक रवी आसवानी, सुभाष कासनगोट्टूवार, छबू वैरागडे, संजय कंचर्लावार, वंदना तिखे, ज्‍योती गेडाम, शीतल कुळमेथे, वनिता डुकरे, माया उईके, सविता कांबळे, शीतल गुरनुले, पुष्‍पा उराडे, भाजप नेते रामपाल सिंह, मतीन शेख आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. संचालन महापौर राखी कंचर्लावार यांनी केले. सूत्रसंचालन स्‍वाती बेत्‍तावार यांनी केले. कार्यक्रमाला शहरातील ज्‍येष्‍ठ नागरिक तसेच नागरिकांची मोठ्या संख्‍येने उपस्थिती होती.

Web Title: Dedication of Renovation of Martyrs' Memorial