शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

सूडाच्या भावनेतून रचला होता कट

By admin | Updated: March 25, 2015 01:32 IST

येथील कुर्झा मार्गावरील अश्विनी किराणा दुकानात १९ फेब्रुवारीला एका निळ्या रंगाच्या स्पोर्टस बॅगमध्ये एक पाव गांजा व सांबराचे कातडे सापडले.

ब्रह्मपुरी : येथील कुर्झा मार्गावरील अश्विनी किराणा दुकानात १९ फेब्रुवारीला एका निळ्या रंगाच्या स्पोर्टस बॅगमध्ये एक पाव गांजा व सांबराचे कातडे सापडले. ही माहिती शहरात पसरताच विविध चर्चांना ऊत आला. ही बॅग कशी, कोठून आणि कुणी ठेवली याचा शोध लावण्याचे वनविभाग व पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मंगळवारी या प्रकरणातील आरोपी महेश तिमाजी देसाई रा. कुर्झा (२५) याला अटक केल्यानंतर या प्रकरणाचा छडा लागला. सुडाच्या भावनेतून हे कट रचल्या गेल्याचे त्याच्या अटकेनंतर सत्य समोर आले. आरोपी महेश हा २०१२ ला एका प्रकरणात ३७६ अन्वये जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत होता. शिक्षा भोगताना कारागृहात मध्यप्रदेशातील एका कैद्याशी त्याची मैत्री झाली. त्याने आपण कोणत्या गुन्ह्यात कारागृहात शिक्षा भोगत आहे, याविषयी सांगितले. त्यानंतर दोघांनीही बदला घेण्यासाठी संगनमत केले. आरोपी महेश हा २१ जानेवारीला सुटून ब्रह्मपुरीला आला. याआधीच तुरुंगातील त्याचा मित्र सुटला होता. दोघेही फोनद्वारे बदला घेण्यासाठी एकमेकांना बाहेर भेटले. यावेळी मध्यप्रदेशातील त्याच्या मित्रांने गांजा व कातडी पुरविल्याचा सत्य बाहेर आले. महेश देसाई याने १९ फेब्रुवारीला वॉर्डातील एका मित्राची दुचाकी घेऊन महाविद्यालयात जाणाऱ्या मुलाला माझी ही बॅग ‘त्या’ दुकानात (अश्विनी किराणा स्टोअर्स) नेऊन ठेवण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्या मुलाने ती बॅग त्या दुकानात ठेवून व एखादी वस्तू खरेदी करून निघून गेला. मुलगा व त्याच्यासोबत असलेली मुलगी दोघेही तोंडाला रूमाल बांधले होते. कालांतराने निनावी फोनने वनविभागाला माहिती देण्यात आली. घटनेचा पंचनामा करून खऱ्या आरोपीच्या शोधात वनविभाग व पोलीस असताना पुन्हा त्याच आरोपीने नवीन डाव रचला होता. मात्र डाव फसला. आरोपीला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)