शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयात गर्दी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 05:01 IST

लॉकडाऊनमध्ये केवळ पाच टक्के कर्मचाऱ्यांच्या भरवशावर शासकीय कार्यालयाचे कामकाज चालवण्यात येत होते. त्यामुळे कोरोनाशी संबंधित कामेच सुरू होती. इतर सर्व कामे बंद असल्याने शासकीय कार्यालये जवळपास ओस पडले होते. जिल्हाधिकारी कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन कार्यालयामध्ये प्रशासकीय बैठक तसेच इतर कामे केली जात होते. मात्र फारशी रेलचेल नव्हती.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांमध्ये भीती : अनेक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचाही फज्जा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. लॉकडाऊनच्या चवथ्या टप्प्यात प्रशासनाने काही व्यवहाराला सूट दिली आहे. अनेक आस्थापनांना सुरू करण्याची परवानगी देत शासकीय कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची टक्केवारी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसह कामानिमित्त येणाऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. परिणामी शासकीय कार्यालयात बरीच वर्दळ सुरू झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.लॉकडाऊनमध्ये केवळ पाच टक्के कर्मचाऱ्यांच्या भरवशावर शासकीय कार्यालयाचे कामकाज चालवण्यात येत होते. त्यामुळे कोरोनाशी संबंधित कामेच सुरू होती. इतर सर्व कामे बंद असल्याने शासकीय कार्यालये जवळपास ओस पडले होते. जिल्हाधिकारी कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन कार्यालयामध्ये प्रशासकीय बैठक तसेच इतर कामे केली जात होते. मात्र फारशी रेलचेल नव्हती. परंतु लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात शासनाने लॉकडाऊन बऱ्यापैकी शिथील केल्यामुळे तसेच प्रशासकीय कार्यालयातही कामकाज सुरु केल्याने कार्यालयातील उपस्थिती वाढवण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय कार्यालये विशेषत: जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय एवढेच नाही तर जिल्हा परिषदेमध्येही वर्दळ वाढली आहे. सद्या सर्वाधिक गर्दी ही शहर व इतर जिल्ह्यामध्ये ये-जा करण्यासाठी पास मिळवणाऱ्यांची होत आहे. या गर्दीमुळे कार्यालयातील अधिकारी, कर्मचारीही त्रस्त झाले आहेत.अधिकारी, कर्मचारी धास्तावलेचंद्रपूर जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालय तसेच जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमध्ये पासेससाठी गर्दी वाढल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा ताण वाढला आहे. या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव तर होणार नाही ना, अशी भीतीही अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये पसरली आहे. उपाययोजना म्हणून सावधगिरी बाळगली जात असून सॅनिटायझर व मास्क घालून काम केले जात आहे.

टॅग्स :Governmentसरकार