शासकीय कार्यालयात गर्दी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 05:00 AM2020-05-20T05:00:00+5:302020-05-20T05:01:05+5:30

लॉकडाऊनमध्ये केवळ पाच टक्के कर्मचाऱ्यांच्या भरवशावर शासकीय कार्यालयाचे कामकाज चालवण्यात येत होते. त्यामुळे कोरोनाशी संबंधित कामेच सुरू होती. इतर सर्व कामे बंद असल्याने शासकीय कार्यालये जवळपास ओस पडले होते. जिल्हाधिकारी कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन कार्यालयामध्ये प्रशासकीय बैठक तसेच इतर कामे केली जात होते. मात्र फारशी रेलचेल नव्हती.

The crowd at the government office grew | शासकीय कार्यालयात गर्दी वाढली

शासकीय कार्यालयात गर्दी वाढली

Next
ठळक मुद्देकर्मचाऱ्यांमध्ये भीती : अनेक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचाही फज्जा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. लॉकडाऊनच्या चवथ्या टप्प्यात प्रशासनाने काही व्यवहाराला सूट दिली आहे. अनेक आस्थापनांना सुरू करण्याची परवानगी देत शासकीय कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची टक्केवारी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसह कामानिमित्त येणाऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. परिणामी शासकीय कार्यालयात बरीच वर्दळ सुरू झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
लॉकडाऊनमध्ये केवळ पाच टक्के कर्मचाऱ्यांच्या भरवशावर शासकीय कार्यालयाचे कामकाज चालवण्यात येत होते. त्यामुळे कोरोनाशी संबंधित कामेच सुरू होती. इतर सर्व कामे बंद असल्याने शासकीय कार्यालये जवळपास ओस पडले होते. जिल्हाधिकारी कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन कार्यालयामध्ये प्रशासकीय बैठक तसेच इतर कामे केली जात होते. मात्र फारशी रेलचेल नव्हती. परंतु लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात शासनाने लॉकडाऊन बऱ्यापैकी शिथील केल्यामुळे तसेच प्रशासकीय कार्यालयातही कामकाज सुरु केल्याने कार्यालयातील उपस्थिती वाढवण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय कार्यालये विशेषत: जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय एवढेच नाही तर जिल्हा परिषदेमध्येही वर्दळ वाढली आहे. सद्या सर्वाधिक गर्दी ही शहर व इतर जिल्ह्यामध्ये ये-जा करण्यासाठी पास मिळवणाऱ्यांची होत आहे. या गर्दीमुळे कार्यालयातील अधिकारी, कर्मचारीही त्रस्त झाले आहेत.

अधिकारी, कर्मचारी धास्तावले
चंद्रपूर जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालय तसेच जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमध्ये पासेससाठी गर्दी वाढल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा ताण वाढला आहे. या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव तर होणार नाही ना, अशी भीतीही अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये पसरली आहे. उपाययोजना म्हणून सावधगिरी बाळगली जात असून सॅनिटायझर व मास्क घालून काम केले जात आहे.

Web Title: The crowd at the government office grew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार