शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 05:00 IST

देशात कोरोना विषाणूचा पसार होताच सुमारे दोन महिने ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात २ मे रोजी पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर शहरात हळूहळू रुग्णसंख्या वाढू लागली. प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. मात्र तरीसुद्धा ५ सप्टेंबरपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात २३ हजार ११८ कोरोनाचे रुग्ण आढळून आले. यापैकी २२ हजार ६२५ जण कोरोनातून मूक्त झाले. 

ठळक मुद्देनोव्हेंबरनंतर कोरोनाचा आलेख घसरला : प्रशासनाच्या प्रयत्नाला यश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा प्रसार मंदावला असला तरीही आजपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाने सुमारे ३९२ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण चंद्रपूर मनपा क्षेत्रात आहे. मनपा क्षेत्रात आजपर्यंत १८८ तर ग्रामीण क्षेत्रात ३० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. प्रशासनाला वाढता मृत्यूदर रोखण्यास यश आले असले तरीही आजपर्यंत झालेल्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक आहे.    देशात कोरोना विषाणूचा पसार होताच सुमारे दोन महिने ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात २ मे रोजी पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर शहरात हळूहळू रुग्णसंख्या वाढू लागली. प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. मात्र तरीसुद्धा ५ सप्टेंबरपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात २३ हजार ११८ कोरोनाचे रुग्ण आढळून आले. यापैकी २२ हजार ६२५ जण कोरोनातून मूक्त झाले. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला मूत्यू १ ऑगस्ट रोजी झाला. त्यानंतर मृतकाच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. सप्टेंबर महिन्यातच जिल्ह्यात चक्क १२३ रुग्णांचा मृत्यू झाला. तर ५ फेब्रुवारीपर्यंत ३९१ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. प्रशासनाच्या प्रयत्नाने आता कोरोना रुग्णाची संख्या कमी झाली असून मृतकांची संख्याही नाहीच्या बरोबरीत आहे. परंतु, कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांना स्वत:ची काळजी घेणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाकडून कळविण्यात येत        आहे. 

सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक मृत्यूचंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण २ मे रोजी आढळून आला. तर  १ ऑगस्ट रोजी पहिला कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर या संख्येत झपाट्याने वाढ झाली. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात १२३ रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंर ऑक्टोबर ७८, नोव्हेंबर ७०, डिसेंबर ६४ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. 

कोरोनाचा प्रसार कमी झाला असला तरीही नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणी विना मॉस्क जाणे टाळावे, बाहेरून आल्यानंतर हात स्वच्छ धुवावे. स्वत:च स्वत:चे रक्षक बनून काळजी घ्यावी, तेव्हाच आपण कोरोनाचा प्रसार रोखू शकतो.- डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या