शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात कोरोना प्रयोगशाळा उघडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:01 IST

कोरोना विषाणू संसर्ग तपासण्यासाठी घशातील थुंकीची चाचणी केल्या जाते. विदर्भात सध्या नागपूर येथे ही तपासणी होत आहे. नुकतीच राज्य शासनाने अकोला येथे अतिरिक्त प्रयोगशाळा उघडण्याची घोषणा केली होती. तथापि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खनिज विभागाच्या सामाजिक दायित्व निधीतून दोन कोटी १८ लक्ष खर्चाची तरतूद करत या कामाला उद्यापासून सुरुवात करण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : कोरोना पॉझिटिव्ह जिल्ह्यातून आता अपडाऊन बंद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या बाबतची तपासणी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या स्वॅब तपासणीची प्रयोगशाळा चंद्रपूर येथे सुरू करण्यात येणार आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी येथे ही घोषणा केली. मंगळवारपासूनच जिल्ह्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात या कामाला सुरुवात होणार आहे.कोरोना विषाणू संसर्ग तपासण्यासाठी घशातील थुंकीची चाचणी केल्या जाते. विदर्भात सध्या नागपूर येथे ही तपासणी होत आहे. नुकतीच राज्य शासनाने अकोला येथे अतिरिक्त प्रयोगशाळा उघडण्याची घोषणा केली होती. तथापि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खनिज विभागाच्या सामाजिक दायित्व निधीतून दोन कोटी १८ लक्ष खर्चाची तरतूद करत या कामाला उद्यापासून सुरुवात करण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. यासोबतच जिल्ह्यात आवश्यक असणाऱ्या २० व्हेंटीलेटरची खरेदी सामाजिक दायित्व निधीतून करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग संदर्भात सुरू असलेल्या प्रशासनाच्या कामाचा जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, आयुक्त राजेश मोहिते यांच्याकडून आढावा घेतला. त्यानंतर जिल्ह्यातील नागरिकांना व्हिडिओ संदेश देताना त्यांनी ही घोषणा केली. चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस.एस. मोरे यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.इतर राज्यात अडकलेल्यांना आणणारगेल्या तीन ते चार महिन्यांपासून गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो मजूर अन्य राज्यात कामाला आहे. लॉकडाऊनमुळे ते अडकले असून त्यामुळे घरातील ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांची आबाळ होत आहे. आपल्या परिवारापासून दूर असणाऱ्या या नागरिकांना घरापर्यंत पोहोचविणे गरजेचे असून या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विनंती केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. लवकरच हा गुंता सोडवण्यात येईल, असे ना. वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.तेंदूपत्ता संकलनाबाबत लवकरच निर्णयराज्याचा महसूल वाढवण्यासाठी आणि गडचिरोली चंद्रपूर व लगतच्या जिल्ह्यातील तेंदूपत्ता उत्पादक व मजूर यांना रोजीरोटी मिळावी, यासाठी तेंदुपत्ता संकलनाला शासनाने परवानगी द्यावी. तसेच आॅनलाइन स्टॅम्प ड्युटी विक्रीला सुरुवात करावी ,अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.जिल्ह्याच्या सीमा ओलांडू नयेचंद्रपूर जिल्हा सध्या कोरोनामुक्त आहे. जिल्ह्यात सध्या एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. पॉझिटिव्ह रुग्ण असणारे नागपूर, यवतमाळ जिल्हे शेजारी आहेत. अन्य राज्यांच्या सीमादेखील चंद्रपूरला लागून आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्याच्या सीमा ओलांडून सुरू असलेल्या अपडाऊनला बंद करा. जिल्हा पोलीस अधीक्षकांना संपूर्ण सीमारेषेवर आणखी बंदोबस्त वाढविण्याची सूचना देण्यात आली आहे. सीमावर्ती भागातील गावातील नागरिकांनीदेखील आपल्या गावात येणाºया नवीन व आगंतुक लोकांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.केशरी कार्डधारकांनाही धान्यपुरवठा विभागामार्फत जिल्ह्यात दोन व तीन रुपये दराने अन्नधान्य व मोफत तांदूळ वाटप सुरु आहे. तरीही अनेक कुटुंबाला तेल, तिखट, डाळ, साखर अशा जीवनावश्यक किराणा वस्तूंची गरज आहे. सामाजिक दायित्व निधीतून जिल्ह्यातील गरिबी रेषेखालील एक लाख ३० हजार व अंत्योदय योजनेतील एक लाख लाभार्थ्यांना २० एप्रिलपासून रेशन दुकानातून धान्य वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये केशरी रेशन कार्ड असणाऱ्यांनाही लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात कोणाचीही उपासमार होऊ नये, शिव भोजन योजना, मोफत अन्नदान योजना राबविताना माणुसकीच्या नात्याने समान वितरण व्हावे, यामध्ये कोणताही दुजाभाव होऊ नये, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या