कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ५४, एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:32 IST2021-08-21T04:32:52+5:302021-08-21T04:32:52+5:30

बाधित आलेल्यात रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील २, भद्रावती २, कोरपना १, राजुरा १, चंद्रपूर तालुका, बल्लारपूर, ब्रह्मपुरी, नागभीड, ...

Corona active patient number 54, one death | कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ५४, एकाचा मृत्यू

कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ५४, एकाचा मृत्यू

बाधित आलेल्यात रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील २, भद्रावती २, कोरपना १, राजुरा १, चंद्रपूर तालुका, बल्लारपूर, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, चिमूर, वरोरा, जिवती आदी तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. मृत झालेल्यामध्ये मूल तालुक्यातील एका पुरुषाचा समावेश आहे.

बाॅक्स

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८८ हजार ६०० वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८७ हजार ७ झाली आहे. सध्या ५४ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ६ लाख ५५ हजार ६८३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ५ लाख ६५ हजार ५४० नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ५३९ बाधितांचे मृत्यू झाले आहे.

Web Title: Corona active patient number 54, one death