शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यातील गोजोलीत आढळली वाकाटक घराण्यातील राजमुद्रा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 13:35 IST

जिल्ह्याच्या गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील प्रकाश उराडे यांच्याकडे पेटीत ६० ग्रॅम वजनाची गोलाकार आकारातील तांब्याची वस्तू सापडली. अभ्यासाअंती हा तांबा राजा पृथ्वीसेन (द्वितीय) यांची राजमुद्रा असल्याची शक्यता पुणे येथील अमोल बनकर व अशोक सिंह ठाकूर यांनी वर्तविली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्याच्या प्राचीन इतिहासात भर : वाकाटककालिन राजमुद्रा असल्याचा अभ्यासकांचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वडिलांच्या निधनानंतर त्यांची पेटी उघडली असता त्यात एक तांब्याची मुद्रा आढळून आली. या वस्तूचा इतिहास समोर आला आणि सारेच अवाक् झाले. ती साधी वस्तू नसून चक्क राजमुद्रा निघाली. वाकाटक घराण्यातील शेवटचा राजा पृथ्वीसेन द्वितीय यांची ती राजमुद्रा होती. पाचव्या शतकातील वाकाटकांची ही राजमुद्रा जिल्हाच्या प्राचीन इतिहासात भर घालणारी ठरणार आहे. या राजमुद्रेवर राजलक्ष्मीचे चित्र अंकित असून ब्राम्ही लिपीत लेख कोरलेला आहे.

जिल्ह्याला प्राचीन इतिहास लाभला आहे. मौर्य, सातवाहन, वाकाटक, परमार, नाग, गोंडराजे व भोसल्यांची येथे सत्ता होती. जिल्ह्याच्या भूगर्भात दडलेला तेजस्वी इतिहास उजेडात येत आहे. गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील प्रकाश उराडे यांच्याकडे ऐतिहासिक ठेवा पडून होता.  मुलगा रणजित उराडे यांने वडीलांच्या खोलीत असलेली जुनी पेटी उघडली. पेटीत ६० ग्रॅम वजनाची गोलाकार आकारातील तांब्याची वस्तू सापडली. ही वस्तू ७ सेमी लांब, ३ सेमी रूंदीची आहे. त्यावर कमलपुष्पावर विराजमान देवीचे चित्र कोरले आहे. देवीच्या उजव्या हातात कमलपुष्प आहे. चित्राखाली ब्राम्ही लिपीत लेख कोरला आहे. ही तांब्याची वस्तू महत्त्वाची वाटल्याने रंजित उराडे याने निलेश झाडे यांची भेट घेतली. निरीक्षण केल्यानंतर चंद्रपूर येथील अभ्यासक अशोक सिंह ठाकूर यांच्याशी संपर्क साधला. अभ्यासाअंती हा तांबा राजा पृथ्वीसेन (द्वितीय) यांची राजमुद्रा असल्याची शक्यता पुणे येथील अमोल बनकर व अशोक सिंह ठाकूर यांनी वर्तविली आहे.राजा पृथ्वीसेन (द्वितीय)चा इतिहासप्रकाश उराडे यांनी जतन करून ठेवलेली ती वस्तू वाकाटक राजवंशातील शेवटचा राजा पृथ्वीसेन (द्वितीय) यांची राजमुद्रा आहे. पृथ्वीसेनाचा कालखंड इ.स.४७५-४९५ असा आहे. पृथ्वीसेनचे ताम्रपट बालाघाट, मांढळ, माहूरझरी येथे मिळाले आहेत. नागपूर जिल्ह्यातील नगरधन येथे वाकाटकांची राजधानी होती. पृथ्वीसेन (द्वितीय) यांची राजमुद्रा जिल्ह्यात सापडल्याने चंद्रपूरच्या प्राचीन इतिहास भर पडल्याचे मानले जात आहे.काय लिहिले राजमुद्रेत?राजमुद्रेवर सुरूवातीलाच राज्यलक्ष्मीचे चित्र कोरले आहे. अश्याप्रकारचे चित्र गुप्त राजवटीतील सोन्याच्या नाण्यावर अंकित असायचे. त्याखाली ब्राम्ही लिपीत लेख कोरला आहे. या लेखाचे वाचन पुणे येथील इंडॉलाजिस्ट बनकर, इतिहास अभ्यासक ठाकूर यांनी केले. लेखात ‘नरेंद्रसेन याचा पुत्र पृथ्वीसेन यांची ही राजमुद्रा’ असे लिहिले आहे.

टॅग्स :historyइतिहास