शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटाचे महिलांच्या सक्षमीकरणात योगदान - घोटेकर

By admin | Updated: July 11, 2017 00:32 IST

महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला गती मिळाली आहे. पदरी पैसा आला की, ...

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला गती मिळाली आहे. पदरी पैसा आला की, घरातील आदर, समाजातील मान्यता व आत्मविश्वासही वाढतो. त्यामुळे बचत गटांच्या या यंत्रणेत महिलांचा सहभाग वाढवा, असे आवाहन महापौर अंजली घोटेकर यांनी केले.खुशिया लोकसंचालित साधन केंद्र यांची आठवी सर्वसाधारण सभा महिलांच्या गौरव साहेळयात त्या बोलत होत्या. आज जी आर्थिक घडी महिला बचत गटात सहभागी झाल्यामुळे झाली आहे. ती अन्य महिलांची झाली पाहिजे. यासाठी बचत गटांचे जाळे महानगरातील दूर्लक्षित व गरीब वस्त्यांमध्ये वाढवा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तेजस्विनी महिला सक्षमीकरण कार्यक्रम अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ द्वारा स्थापित खुशिया लोक संचालित साधन केंद्र चंद्रपूर व समाज कल्याण विभाग जि.प. चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.व्यासपीठावर जि.प.सभापती ब्रिजभुषण पाझारे, ताडोबा प्रकल्प उपसंचालक जी. पी. नरवणे, नाबार्डचे महाप्रबंधक आदिनाथ टेले, वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी नरेश उगेमुगे, सहायक समन्वय अधिकारी योगिता साठोणे, संगिता मेश्राम, खुशिया सीएमआरसीच्या व्यवस्थापक शारदा हुसे व सर्व खुशिया साधन केंद्राच्या सदस्या आदीची कार्यक्रमाला उपस्थिती होती. चंद्रपूरसारख्या महानगरात इतक्या मोठया प्रमाणात महिला बचत गटाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी शारदा हुसे यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या जिल्हा समन्वय अधिकारी नरेश उगेमुगे यांचे कौतुक केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी देखील संबोधित करुन महिला बचत गटांनी वेगवेगळया आयोजनामध्ये आपला ठसा उमटवल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.