शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पावसाची संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 05:00 IST

उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. जुलै महिन्याच्या प्रारंभी थोडाफार पाऊस झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आता पाऊस नियमितपणे येईल असा अंदाज बांधत कापूस, धान व सोयाबीन पिकांची पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. पाऊस अचानक गायब होऊन उकाडा वाढायला लागला. त्यामुळे नागरिक पुन्हा वैतागू लागले. दुसरीकडे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पाऊस हवा असल्याने त्यांची झोपच उडाली.

ठळक मुद्देनदी-नाल्यांमध्ये पाणी साचले : आतापर्यंत ३७१.७ मिमी पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच मंगळवारी रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यात बऱ्यापैकी पाणी जमा झाले असून नदी-नाले फुगू लागले आहेत. आतापर्यंत सरासरी ३७१.७ मिमी पावसाची जिल्ह्यात नोंद झाली आहे.हवामान खात्याने यंदा जून महिन्यातच मान्सूनचे आगमन होऊन दमदार पाऊस येथील, असा अंदाज वर्तविला होता. मात्र जिल्ह्यात जून महिन्यात तसा पाऊस आला नाही. उलट उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. जुलै महिन्याच्या प्रारंभी थोडाफार पाऊस झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आता पाऊस नियमितपणे येईल असा अंदाज बांधत कापूस, धान व सोयाबीन पिकांची पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. पाऊस अचानक गायब होऊन उकाडा वाढायला लागला. त्यामुळे नागरिक पुन्हा वैतागू लागले. दुसरीकडे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पाऊस हवा असल्याने त्यांची झोपच उडाली.अनेकांचे पऱ्हे जमिनीतच कोमेजू लागले. दुबार पेरणीचे संकट अनेक शेतकऱ्यांवर ओढवले. अशातच १० जुलैपासून पावसाने हजेरी लावणे सुरू केले. सोमवारी जिल्ह्यातील काही भागात दमदार पाऊस झाला. त्यानंतर मंगळवारी रात्रीपासून चंद्रपूरसह जिल्हाभरातच संततधार पावसाला सुरूवात झाली.बुधवारी दुपारपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. संपूर्ण जिल्हाभरात सरासरी ३७१.७ मिमी पावसाची नोंद झाली.संततधार पावसामुळे आता जलसाठ्यात वाढ होत आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या वर्धा, पैनगंगा, इरई, उमा, शिरणा या नद्यांच्या पात्रातही आता बऱ्यापैकी पाणी वाहू लागले आहे. हा पाऊस जमिनीत मुरल्याने शेतकऱ्यांच्या बांधातही पाणी जमा झाले आहे. यामुळे शेतकरीवर्ग सुखावला आहे.

टॅग्स :Rainपाऊस