शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी समजत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
3
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
4
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
5
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
6
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
7
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
8
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
9
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
10
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
11
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
12
LIVE: नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मुलाचा संताप, काय म्हणाला?
13
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
14
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
15
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
16
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
17
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
18
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
19
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
20
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
Daily Top 2Weekly Top 5

योजनेत बांधकाम विभागाचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 05:01 IST

या संदर्भात नगर परिषद मुख्याधिकारी यांनी बांधकाम विभाग चंद्रपूर यांना २४ जून २०२० ला पत्र दिले. रस्त्याचे बाजूने बांधकाम विभागाने साईड पट्टीचे काम सुरु केले आहे. ते जर पूर्ण झाले तर मजीप्राच्या जलवाहिन्या टाकण्यासाठी पुन्हा पक्का मार्ग खोदावा लागेल व शासकीय निधी वाया जाईल म्हणून काम थांबवावे, असे पत्रात म्हटले आहे. परंतु बांधकाम विभागाने ते काम न थांबविता अजूनही जलवाहिन्या टाकण्यासाठी परवानगी दिली नाही.

ठळक मुद्देपाणी पुरवठा योजना : जलवाहिन्या टाकण्यास परवानगी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : मागील दोन वर्षांपासून बल्लारपूर शहराला २४ तास पाणी मिळावे म्हणून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत बल्लारपूर शहरातील वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. मात्र रस्त्याच्या बाजूने जलवाहिन्या टाकण्याची परवानगी बांधकाम विभागाकडून मिळत नसल्यामुळे मागील दोन महिन्यांपासून मजीप्राचे काम थंडबस्त्यात आहे.या संदर्भात नगर परिषद मुख्याधिकारी यांनी बांधकाम विभाग चंद्रपूर यांना २४ जून २०२० ला पत्र दिले. रस्त्याचे बाजूने बांधकाम विभागाने साईड पट्टीचे काम सुरु केले आहे. ते जर पूर्ण झाले तर मजीप्राच्या जलवाहिन्या टाकण्यासाठी पुन्हा पक्का मार्ग खोदावा लागेल व शासकीय निधी वाया जाईल म्हणून काम थांबवावे, असे पत्रात म्हटले आहे. परंतु बांधकाम विभागाने ते काम न थांबविता अजूनही जलवाहिन्या टाकण्यासाठी परवानगी दिली नाही. यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची २४ तास पाणी पुरवठा योजना अपूर्ण आहे. बांधकाम विभाग एक महिन्यापासून राज्यमार्गाच्या बाजूने ज्या साईड पट्टीचे काम करीत आहे, त्याच्या डाव्या बाजूने बल्लारपूरसाठी दुसरी जलवाहिनी टाकण्याचे काम करायचे आहे. परंतु या कामास सार्वजनिक बांधकाम विभाग भद्रावती यांनी अजूनपर्यंत मंजुरी दिली नसल्याचे मजीप्रा अभियंता यांनी सांगितले.बल्लारपूर पाणी पुरवठा योजना टप्पा-२ अंतर्गत बल्लारपूर शहरातून कलामंदिर ते गुरुनानक कॉलेजपर्यंत पाईपलाईन टाकण्याच्या संदर्भात बल्लारपूर नगर परिषदेने पत्र दिले. कामाची पाहणी झाली. दोनदा सार्वजनिक बांधकाम विभागाशी बैठकीत चर्चा करण्यात आली. तरी अजूनपर्यंत परवानगी मिळाली नाही. यामुळे कामास उशीर होत आहे.- सुशील पाटील, उपविभागीय अभियंता,मजीप्रा, बल्लारपूर.

टॅग्स :Waterपाणी