शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम सभापती विखार यांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:19 IST

ब्रह्मपुरी : शहरातील कुर्झा येथील रहिवासी व नगरपालिकेचे बांधकाम सभापती विलास विखार हे शेतकऱ्यांमधील वाद सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाच ...

ब्रह्मपुरी : शहरातील कुर्झा येथील रहिवासी व नगरपालिकेचे बांधकाम सभापती विलास विखार हे शेतकऱ्यांमधील वाद सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाच जबर मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री घडली.

बुधवारी रात्रीच्या सुमारास कुर्झा येथील नगरसेवक विलास विखार यांच्याकडे काही शेतकरी धान विक्रीची समस्या घेऊन आले. लोकप्रतिनिधी असल्याने समस्या निपटारा करण्यासाठी प्रयत्न केला. धान्य व्यापारी रजत रामकृष्ण थोटे यांनी सहा महिन्यांपूर्वी दहा-पंधरा शेतकऱ्यांकडून २३०० प्रतिक्विंटल प्रमाणे धान खरेदी केले; पण रजत हा आता १८०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे धान्याचे पैसे शेतकऱ्यांना देत होता. पण शेतकऱ्यांना २३०० प्रतिक्विंटल दर पाहिजे असल्याने ते शेतकऱ्यांना मान्य नव्हते. यासाठी नगरसेवक विलास विखार हे रजत रामकृष्ण थोटे, रामकृष्ण थोटे, शुभम थोटे यांच्याकडे शेतकऱ्यांना घेऊन गेले असता ‘तू कोण आहेस’, असे बोलून रामकृष्ण थोटे यांनी नगरसेवक विलास विखार यांच्या डोक्यावर विटेने जबर मारहाण केली. संबंधित दोन्ही मुलांनी शिवागाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. विखार यांनी रक्तबंबाळ अवस्थेतच ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. तक्रारीवरून‌ तिन्ही आरोपींविरोधात कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष बोरकर करीत आहेत.