शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ रेल्वेगेटविरोधात काँग्रेस छेडणार तीव्र आंदोलन

By admin | Updated: April 8, 2016 00:55 IST

केवळ सिमेंट कंपन्याचे हट्ट पुरविण्यासाठी राजुरा शहरातील आसिफाबाद रोडवर रेल्वेगेट तयार केले आहे.

अनेकदा गेट बंद : पाच हजार विद्यार्थ्यांचे जाणेयेणे प्रभावितराजुरा : केवळ सिमेंट कंपन्याचे हट्ट पुरविण्यासाठी राजुरा शहरातील आसिफाबाद रोडवर रेल्वेगेट तयार केले आहे. मात्र या गेटमुळे पाच हजार विद्यार्थी वेठीस धरले जात आहे. या विरोधात राजुरा तालुका युवक काँग्रेसतर्फे आंदोलनाचा इशारा दिला आहे. या रेल्वे गेटच्या पुढे दहा शाळा महाविद्यालय असून पाच हजार विद्यार्थी दररोज ये-जा करतात. नेमके परीक्षेच्या वेळेलाच गेट बंद असतो. सकाळपासून सायंकाळपर्यंत दहा ते पंधरा वेळा गेट बंद करण्यात येते. कधी गाडी अर्धा- अर्धा तास येत नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालक ताटकळत बसतात. हा अत्यंत गंभीर प्रश्न असून दिवसा गाड्या चालऊ नका, चालवायच्या असले तर उड्डानपूल बांधा. करोडो रुपये नफा कमविणाऱ्या या सिमेंट कंपन्या शहरातील नागरिक व विद्यार्थ्यांना वेठीस धरत आहे. रेल्वेच्या मुजोरीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. राजुरा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष गोलु ठाकरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की या रेल्वेगेटमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बुधवारी सकाळी ९ वाजता गोंडवाना विद्यापीठाचा पेपर होता. नेमके ८.५० वाजता गेट बंद झाले. कोणतीच गाडी आली नाही. ९.१० वाजता गेट सुरु केले. गेटवरील नोकरी करणारे मुजोरी करीत असून हा प्रकार न थांबविल्यास पाच हजार विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरण्याचा इशारा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गोलु ठाकरे यांनी दिला आहे. मागील अनेक वर्षापासून गेटचा प्रश्न प्रलंबित असून गेटजवळ मोठमोठे खड्डे पडले आहे. दोन महिन्यापूर्वी केलेल्या रस्त्याची दैनावस्था झाली आहे. हे रेल्वे गेट नागरिकांची डोकेदुखी ठरत असून १५ दिवसात उचित कार्यवाही न केल्यास सिमेंटच्या गाड्या जाऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. (शहर प्रतिनिधी)