शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ मोहीम

By admin | Updated: July 14, 2017 00:22 IST

हे फसणवीस सरकार आहे हे सिद्ध करण्यासाठी काँग्रेसने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील गावागावांमध्ये जावून ‘माझी कर्जंमाफी झाली नाही

विजय वडेट्टीवार : पावसाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याचे संकेत लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : हे फसणवीस सरकार आहे हे सिद्ध करण्यासाठी काँग्रेसने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील गावागावांमध्ये जावून ‘माझी कर्जंमाफी झाली नाही’ असे फार्म शेतकऱ्यांकडून भरून घेण्याची मोहीम आखली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात या या मोहीमेची सुरूवात ब्रह्मपुरी तालुक्यातून करण्यात आली असल्याची माहिती आ. विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. कर्जमाफीवरून विरोधक येत्या पावसाळी अधिवेशात सरकारला घेरले जाणार असल्याचे अप्रत्यक्ष संकेतच आ. वडेट्टीवार यांनी यावेळी दिले.कर्जमाफीबाबत राज्य सरकार केवळ ‘जीआरवर जीआर’ काढत आहे. ३४ हजार कोटींची कर्जमाफीची घोषणा केली. मात्र त्यानंतर ज्या अटी लादल्या त्यामुळे केवळ ३० टक्के शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळणार आहे. हे सिद्ध करण्यासाठी येत्या २० जुलैपर्यंत तालुकानिहाय दिंडी काढून शेतकऱ्यांकडून ‘‘फार्म’ भरुन घेतले जाणार आहे. यावर गावांमध्ये चावडी वाचनही केले जाणार आहे. शेतकऱ्यांकडून गोळा झालेले ‘माझी कर्जंमाफी झाली नाही’ हे फार्म प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांकडे देणार आहे, असेही आ. वडेट्टीवार म्हणाले. शासन दररोज नवनवीन जीआर काढून कर्जमाफीबाबत अटी लादत आहे. यामुळे राज्यातील एक कोटी ३६ लाख शेतकऱ्यांपैकी केवळ ३० टक्केच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. उर्वरित शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ९६ हजार शेतकरी वंचित राहणार असल्याचेही आ. वडेट्टीवार म्हणाले. कर्जमाफी जून २०१६ पर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. ती जून २०१७ पर्यंत कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी असती तर ८२ टक्के शेतकरी फायदा घेऊ शकले असते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. या सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. शेतीपूरक उद्योगासाठी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले. त्यांनाही कर्जमाफी द्यावी, अशी मागणीही आ. वडेट्टीवार यांनी केली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष नंदु नागरकर, चंद्रपूर विधानसभा मतदार संघाचे प्रमुख महेश मेंढे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अश्वीनी खोब्रागडे, जि.प.चे काँग्रेसचे गटनेते सतीश वारजुरकर, बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, विनायक बांगडे, युवक काँग्रेसचे शिवा राव यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.