शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांसह ११ जणांना आयुक्तांनी बजावला नोटीस

By admin | Updated: March 12, 2015 00:35 IST

काँग्रेसला सोडून भाजपात प्रवेश करणाऱ्या महापौर राखी कंचर्लावार, काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरोधात मतदान करणारे मनपा सभापती रामू तिवारी ...

चंद्रपूर : काँग्रेसला सोडून भाजपात प्रवेश करणाऱ्या महापौर राखी कंचर्लावार, काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरोधात मतदान करणारे मनपा सभापती रामू तिवारी व अन्य दहा नगरसेवकांना अपात्र का करण्यात येऊ नये, या आशयाचा विभागीय आयुक्तांनी नोटीस बजावली आहे. यामुळे पुन्हा एकदा वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.काँग्रेसच्या सुनिता लोढीया तसेच काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश करणाऱ्या राखी कंचर्लावार या भाजपाच्या महापौर पदाच्या उमेदवार होत्या. यात भाजपच्या राखी कंचर्लावार विजयी झाल्या. दरम्यान, पक्षांतर्गत बंदी कायद्यांतर्गत सुनिता लोढीया यांनी विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्याकडे १६ डिसेंबरला दाद मागितली. त्यानंतर २३ जानेवारी २०१५ रोजी महापौर कंचर्लावार, सभापती रामू तिवारी व दहा नगरसेवकांना अपात्र घोषित करावे, यासाठी आयुक्तांनी प्रकरण दाखल केले. ४ मार्चला महापौर कंचर्लावार, सभापती रामू तिवारी, नगरसेवक संगीता अमृतकर, दुर्गेश कोडाम, राजेश अडूर, करीमलाला काझी, अनिल रामटेके, मेहर सिडाम, एकता गुरनुले व संतोष लहामगे यांना अपात्र का घोषित करू नये, या आशयाची नोटीस बजावली आहे.महापौरपदासाठी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार लोढीया असताना या सर्वांनी त्यांच्या विरोधात जाऊन भाजपात प्रवेश करणाऱ्या कंचर्लावार यांना मतदान केले. विशेष म्हणजे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला मतदान करा, असा व्हीप जारी केला होता. या व्हीपला केराची टोपली दाखवून मतदान करण्यात आले. त्यामुळेच या सर्वांना नोटीस बजावण्यात आला आहेत. यासंदर्भात २३ मार्चला आयुक्तांच्या कार्यालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीला सर्वांना हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.(शहर प्रतिनिधी)