शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
3
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
4
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
5
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
6
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
7
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
8
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
9
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
10
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
11
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
12
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
13
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
14
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
15
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
16
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
18
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
19
पतीला भेटायला युवक घरी आला अन्...; कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
20
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
Daily Top 2Weekly Top 5

कलर्स प्रस्तुत महाकालीचे महामंच २२ जुलै रोजी-अंत ही आरंभ है

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:42 IST

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधीके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते-....

लोकमतच्या वाचकांसाठी स्पर्धा : एकल व समूह नृत्य स्पर्धेत दाखवा आपले कौशल्य लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधीके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते-शक्तीची देवता, भक्तीची प्रेरणा- आई जगदंबा असो की माँ महाकाली असो, तिच्या विविध रूपातून तिच्या अलौकिक शक्तीचे दर्शन भक्तांना घडत असते. मग हा भक्त आपल्या भक्तीद्वारे तिला प्रसन्न करीत असतो. मग ती पूजा, अर्चना, आरती असो की नृत्य, भजन, गोंधळ असो. म्हणूनच कलेची उपासना ज्या देवीला आवडते, तिच्या स्वरूपात आपल्या भक्तांसाठी महाकालीचे मंच म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नृत्याच्या स्वरूपात देवीच्या आराधनेतून सामाजिक संदेश देणारा हा कार्यक्रम आध्यात्मिक आणि सामाजिक बांधिलकी जपणारा कार्यक्रम ठरणार आहे; हे निश्चित. २२ जुलै रोजी स्थानिक जैन भवन, पठाणपुरा रोड चंद्रपूर येथे हा कार्यक्रम दुपारी १ वाजता आयोजित केला आहे. यात एकलनृत्य व समूह नृत्य स्पर्धा घेण्यात येणार असून स्पर्धा सर्व लोकमत वाचकांसाठी खुली असून १० वर्षाच्या वर कुणीही स्त्री किंवा पुरुष यात सहभागी होऊ शकतात. नृत्य ज्या गीतावर आधारित आहे त्याचा कालावधी ५ मिनिट असून त्यात सामाजिक संदेश असणे आवश्यक आहे. ज्यात हुंडाबळी, बेटी बचाओ, महिला सशक्तीकरण, स्त्री अत्याचार आदींचा समावेश असावा. महाकालीचे महामंच याद्वारे कलाकारांना घडविणार आहे. असे म्हणतात शिव हा शक्तीशिवाय शव आहे. शक्तीची देवता महाकाली शिवाय शिव अपूर्ण आहे. आपल्या अक्राळविक्राळ शक्तीने महाकाली ओळखल्या जातात. पण संहारक म्हणून महाकाली पूज्य आहे. अशा या महाकालीचे दर्शन तिची महिमा सांगणारी कलर्सची येणारी मालिका म्हणजे ‘महाकाली, अंत ही आरंभ है’. ही मालिका २२ जुलै रोजी प्रसारित होणार असून प्रत्येक शनिवार व रविवारी संध्या. ७ वा. कलर्स चॅनलवर बघायला विसरू नका. या मालिकेद्वारे एक संदेश देण्याचा प्रयत्न कलर्स चॅनलद्वारे करण्यात आला आहे. स्त्री ही वात्सल्यमूर्ती आहे. पण प्रसंगी ती महाकालीचे रूप धारण करून दुष्टांचा संहार करते. नाजूक कोमल हृदयाची स्वामीनी रणचंडीका होऊन संहारक बनते, तेव्हा तिच्यातील शक्तीचा बोध घेणे हा मालिकेचा उद्देश आहे आणि म्हणूनच अशा नृत्य स्पर्धेतून हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून सर्व वाचक वर्ग कार्यक्रम बघण्याकरिता सादर आमंत्रित आहे. स्पर्धादेखील नि:शुल्क असून स्पर्धेची नोंदणी कार्यालयात येऊन करावी लागेल. अधिक माहितीसाठी संपर्क- पूजा ठाकरे ९०११३२२६७४, ७०३८८०२६७५ यावर संपर्क साधावा.