स्वच्छतेचा संदेश देणारा रोबोट

By Admin | Updated: October 8, 2016 01:44 IST2016-10-08T01:44:19+5:302016-10-08T01:44:19+5:30

बल्लारपूर नगर परिषदेने स्वच्छतेचा संदेश देणारा रोबोट तयार केला असून चंद्रपूरला जिल्हा

Cleaner Robot | स्वच्छतेचा संदेश देणारा रोबोट

स्वच्छतेचा संदेश देणारा रोबोट

बल्लारपूर : बल्लारपूर नगर परिषदेने स्वच्छतेचा संदेश देणारा रोबोट तयार केला असून चंद्रपूरला जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित म.गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त चंद्रपूरला झालेल्या महास्वच्छता आणि व्यसनमुक्ती मेळाव्यात या रोबोटची पाहुण्यांसह सर्वांनी प्रशंसा केली.
बल्लारपूर नगर परिषदेने प्लास्टिकवर बंदी, घनकचरा व्यवस्थापानातून स्वतनिर्मिती व खत विक्री हागणदारी मुक्तचे कार्य याबाबत यामेळाव्यात माहितीपर प्रदर्शनी ठेवली. रोबोटने ती माहिती आपल्या माध्यमातून प्रसारित केली.
या मेळाव्याचे अतिथी पालकमंत्री सुुधीर मुनगंटीवार तसेच पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांचे हस्ते बल्लारपूरच्या नगराध्यक्षा छाया मडावी, मुख्याधिकारी विपीन मुदधा या सोबतच पाणी पुरवठा अभियंता संकेत नंदवंशी, स्वच्छता निरीक्षक कर्मवीर सौदागर यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Cleaner Robot