शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

खुल्या भूखंडाची करा स्वच्छता, अन्यथा कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 05:00 IST

चंद्रपूर शहराभोवती छोटया-मोठ्या उद्योगांचे जाळे पसरले आहे. यातूनच चंद्रपूूरला औद्योगिक जिल्ह्याची ओळख मिळाली. या उद्योगांत रोजगारासाठी गावखेड्यातील अनेकजण शहरात दाखल झाले आहेत. किरायाच्या घरात राहून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. यातूनच चंद्रपूर शहराचे महानगरात रुपांतर झाले. किरायाच्या घरातून अनेकांनी स्वत:च्या मालकीच्या घरकुलाचे स्वप्ने बघितली. पैशाची जुळवाजुळव करून मिळेल तिथे भूखंड खरेदी करून ठेवले आहेत.

ठळक मुद्देमहापालिकेचा निर्णय : अधिकाऱ्यांची तातडीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरात प्रापर्टीच्या नावावर अनेकांनी भूखंड खरेदी करून ठेवले आहेत. मात्र, हे भूखंड आजघडीला परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले आहेत. कचऱ्यांच्या ढिगाऱ्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे संबंधित मालकांनी भूखंडाची स्वच्छता करावी, अन्यथा महानगरपालिका प्रशासनाकडून कारवाई केली जाणार आहे. तसा निर्णय मनपाने घेतला आहे.चंद्रपूर शहराभोवती छोटया-मोठ्या उद्योगांचे जाळे पसरले आहे. यातूनच चंद्रपूूरला औद्योगिक जिल्ह्याची ओळख मिळाली. या उद्योगांत रोजगारासाठी गावखेड्यातील अनेकजण शहरात दाखल झाले आहेत. किरायाच्या घरात राहून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. यातूनच चंद्रपूर शहराचे महानगरात रुपांतर झाले. किरायाच्या घरातून अनेकांनी स्वत:च्या मालकीच्या घरकुलाचे स्वप्ने बघितली. पैशाची जुळवाजुळव करून मिळेल तिथे भूखंड खरेदी करून ठेवले आहेत. तर, शहरातील अनेकांनी प्रापर्टीच्या नावावर भूखंड खरेदी करून ठेवले आहेत.मनपा अधीकाऱ्यांची तातडीची बैठक घेत  कचऱ्याचे ढिग असलेल्या भूखंडाची संबधित मालकांनी तपासणी करावी. अन्यथा मनपा प्रशासनाकडून कारवाई केली जाईल, असे स्पष्ट निर्देश दिले. शहरातील खुल्या भूखंडधारकांची यादी तयार करावी. भूखंडावर कर आकारणी करावी. ३१ आक्टोबरपर्यंत भूखंडधारकांना नोटीस बजावावी, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. या बैठकीला आयुक्त राजेश मोहिते, उपायुक्त विशाल वाघ, उपायुक्त अनिल घुमडे, सहायक आयुक्त शीतल वाकडे, विद्या पाटील उपस्थित होते.

रस्त्यावरील वीज खांब हटविणारशहरात जिथेही विद्युत खांब रस्त्यावर आलेले आहेत, असे खांब काढण्यासाठी त्यांची यादी तयार करून ती म.रा.विद्युत वितरण कंपनीकडे पाठविण्याचे निर्देशही त्यांनी याप्रसंगी दिले. शहरातील मोक्याची ठिकाणे निश्चित करणे, दर निश्चित करणे, शुभेच्छा फलकांची जागा निश्चिती करणे, अन्य होर्डिंग्जची यादी तयार करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच शहरातील मोकाट कुत्री, डुकरांचा तातडीने बंदोबस्त करण्याबाबतही यावेळी चर्चा झाली.  गुंतवणूक म्हणून भूखंड खरेदीमजूरवर्गाकडे घरे बांधण्यासाठी लाखो रुपये हातात नाही. बँकेकडूून कर्ज उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या घराचे स्वप्न लांबत आहे. तर, दुसरीकडे काही केवळ जमिनीचा दर वाढून जास्त पैसा  मिळेल, या प्रतीक्षेत आहेत. मात्र, या खुल्या भूखंडांत अनेकजण कचरा टाकत आहेत. बघता बघता कचऱ्याचे  ढिगारे तयार होऊन परिसरात दुर्गंधी पसरत आहे. याबाबत वॉर्डातील नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे अनेक तक्रारी केल्या. या तक्रारीची दखल घेत महापौर राखी कंचर्लावार यांनी नागरिकांची ही समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका