सोशल मिडियावरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी शहर काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 07:00 IST2020-10-05T07:00:00+5:302020-10-05T07:00:17+5:30

Chandrapur News, Agitation राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी नथुराम गोडसे प्रवृत्तीच्या समीर केने या माथेफिरूने समाज माध्यमात आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली, असा आरोप करून केने याला अटक करा, अशा मागणीसाठी रविवारी गांधी चौकात शहर काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले.

City Congress protests over offensive post on social media | सोशल मिडियावरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी शहर काँग्रेसची निदर्शने

सोशल मिडियावरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी शहर काँग्रेसची निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी नथुराम गोडसे प्रवृत्तीच्या समीर केने या माथेफिरूने समाज माध्यमात आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली, असा आरोप करून केने याला अटक करा, अशा मागणीसाठी रविवारी गांधी चौकात शहर काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. केनेला अटक न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी दिला.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केली. परंतु, गांधीजींचे विचार ही प्रवृत्ती संपवू शकली नाही. नथुराम गोडसे प्रवृत्तीच्या समीर केने या माथेफिरूने समाज माध्यमात गांधीजींची तुलना आसाराम बापूशी करीत आक्षेपार्ह विधान केले होते. या घटनेचे पडसाद उमटले. शनिवारी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामू तिवारी यांनी केनेविरोधात अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बहादुरे यांच्याकडे तक्रार दाखल करून अटकेची मागणी केली.
 

Web Title: City Congress protests over offensive post on social media