शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

अखेर नागरिकांनी पाळला ‘जनता कर्फ्यू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 05:00 IST

जिल्हा प्रशासनाने जनता कर्फ्यू लागू करण्याची घोषणा रविवारी केली होती. त्यामुळे नागरिकांना आवश्यकतेनुसार किराणा सामान विकत घेऊन साठविण्याची मुभा मिळाली. मंगळवारी चंद्रपुरातील गोलबाजारात खरेदीसाठी प्रचंड गर्दी उसळली होती. आज किराणा, धान्य व अन्य जीवनाश्यक वस्तू विकणाऱ्या व्यापाऱ्यांनी दुकाने कडकडीत बंद ठेवून जनता कर्फ्यू प्रतिसाद दिला. 

ठळक मुद्देजनता कर्फ्यूचा पहिला दिवसचंद्रपुरात कडकडीत बंदजिल्हाभरातील नागरिकांचा प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संसर्गाचा उद्रेक झाल्याने ही साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले होते. बुधवारी पहिल्या दिवशी त्याला जिल्हाभरातील नागरिक व व्यावसायिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. २१ ते २५ एप्रिल २०२१ आणि २८ एप्रिल ते १ मे २०२१ अशा दोन टप्प्यांत  जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. झपाट्याने वाढणारा कोरोनाबाधितांचा उच्चांक व मृत्यूचे तांडव सुरूच असल्याने चंद्रपूर शहरासह व ग्रामीण भागातील नागरिकांनीही कडकडीत बंद पाळला. रस्त्यांवरील वाहनांची तुरळक गर्दी, रुग्णालये व मेडिकल स्टोअर्सचा अपवाद वगळल्यास बुधवारी सर्व व्यवहार बंद असल्याचे दिसून आले. 

हातगाडीवरील विक्रेत्यांचे हाल चंद्रपूर शहर व जिल्ह्यात सुमारे हातगाडीवर विविध वस्तू विकणारे सुमारे ३५ हजार विक्रेते आहेत. ब्रेक द चेन मोहिमेपासून त्यांच्या व्यवसायाला फटका बसला. तेव्हापासून त्यांच्या जगण्याचे वांद्ये झाले. जनता कर्फ्यू लागू झाल्याने त्यांचे हाल सुरू आहेत.

चंद्रपुरातील बाजारात शुकशुकाट जिल्हा प्रशासनाने जनता कर्फ्यू लागू करण्याची घोषणा रविवारी केली होती. त्यामुळे नागरिकांना आवश्यकतेनुसार किराणा सामान विकत घेऊन साठविण्याची मुभा मिळाली. मंगळवारी चंद्रपुरातील गोलबाजारात खरेदीसाठी प्रचंड गर्दी उसळली होती. आज किराणा, धान्य व अन्य जीवनाश्यक वस्तू विकणाऱ्या व्यापाऱ्यांनी दुकाने कडकडीत बंद ठेवून जनता कर्फ्यू प्रतिसाद दिला. सराफा, कापड व्यापाऱ्यांचाही प्रतिसादसराफा कापड बाजार व अन्य व्यापारी आस्थापनांनी जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी बंद पाळून प्रशासनाला सहकार्य केले. जिल्हाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या ऑनलाईन बैठकीत व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. काही मागण्याही मांडल्या. मात्र, शहरातील कोरोना उद्रेक लक्षात घेऊन प्रशासनाने जनता कर्फ्यू लागू केल्याने व्यापाऱ्यांनीही उत्तम प्रतिसाद दिल्याचे आज दिसून आले. भाजीपाला, फळ मार्केट बंददाताळा मार्गावरील महात्मा जोतिबा फुले भाजीपाला बाजार बुधवारी बंद होता. या बाजारातून चंद्रपूर शहर व काही तालुक्यात भाजीपाल्याचा पुरवठा केला जातो. याच परिसरातील फळ बाजाराचे व्यवहारही बंद ठेवण्यात आले.

विनाकारण फिरणाऱ्यांना चाप जनता कर्फ्यू दरम्यान जटपुरा गेट, गांधी चौक, पोलीस वाहतूक शाखा तुकूम मार्ग व बंगाली कॅम्प चौक परिसरात पोलिसांनी बॅरिकेट्स लावून कडक बंदोबस्त ठेवला आहे. विनाकारण शहरात फिरणाऱ्यांची पोलीस चौकाचौकांत नाकाबंदी करून तपासणी करीत होते. 

पेट्रोल पंपावर गर्दीकडक लॉकडाऊन लागू होण्याच्या धास्तीमुळे चंद्रपुरातील वाहनधारकांनी आज पेट्रोलपंपावर मोठी गर्दी केली. सकाळी १० वाजता दुचाकीचालक व ऑटोची रांग लागली होती. पेट्रोल पंप सुरूच राहणार असे पेट्रोल पंपचालकांनी सांगितल्यानंतरही उद्या काय होणार, याची खात्री नसल्याने भीतीमुळे वाहनात पेट्रोल भरून घेताना दिसले. 

अत्यावश्यक सेवा सुरूच सर्व रुग्णालये, औषधी दुकाने, घरपोच सेवासह दूध वितरण, वर्तमानपत्र, सिलिंडर वितरण व हॉटेलमधून डिलिव्हरी बायद्वारे घरपोच पार्सल पोहोचविण्याची सेवा आज सुरू होती. कृषी केंद्र व पशुखाद्य दुकाने सुरू ठेवण्यास प्रशासनाने परवागनी दिली. मात्र, चंद्रपुरातील दुकाने बंद दिसून आली.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस