शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

चिमूर - ब्रम्हपुरीत राष्ट्रवादी काँग्रेसला नवसंजिवनी देण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:35 IST

घनश्याम नवघडे नागभीड : जिल्हा परिषद, पंचायत समित्या व नगर परिषदांची निवडणूक वर्षभरावर आली असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य नेतृत्त्वाने ...

घनश्याम नवघडे

नागभीड : जिल्हा परिषद, पंचायत समित्या व नगर परिषदांची निवडणूक वर्षभरावर आली असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य नेतृत्त्वाने चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर व ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात जबरदस्त फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. यात या दोन्ही क्षेत्रातील दोन मोठे नेते गळाला लागले असल्याचेही बोलले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला आता २० वर्षांपेक्षा अधिक कालावधी होत असला तरी या दोन्ही क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसची अद्याप पाळेमुळे रूजली नाहीत. या दोन्ही क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस 'नाही'च्या बरोबरीतच आहे. याची जाणीव राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्त्वाला आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील आहे. म्हणूनच जयंत पाटील यांच्यासारख्या नेत्याला राष्ट्रवादी काँग्रेसने कामाला लावले असावे, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

याचाच एक भाग म्हणून राज्याचे पाटबंधारे मंत्री जयंत पाटील यांनी गुरुवारी आणि शुक्रवारी या दोन्ही विधानसभा क्षेत्राचा दौरा केला. या दौऱ्यात पाटील यांनी ब्रम्हपुरीतील एक मोठे नेते यांच्याशी बरीच खलबते केली असल्याचे बोलले जात आहे. या नेत्याने ब्रम्हपुरीचे बरीच वर्ष नेतृत्व केले असून, एकदा अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूकही लढली आहे. एवढेच नाही तर या नेत्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका केंद्रीय नेत्याशी कौटुंबीक संबंधही आहेत.

जयंत पाटील यांनी चिमूर विधानसभा क्षेत्रातून फार थोड्या मतांनी पराभूत झालेल्या एका नेत्याची घेतलेली अशीच एक भेट राजकीय 'तडका' ठरला आहे. चिमूर विधानसभा क्षेत्रात सध्या नवनवीन राजकीय समीकरणे उदयास येत आहेत. या समीकरणांनी हा नेता विचलित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याची जाणीव राष्ट्रवादीच्या नेतत्त्वाला झाली असावी. म्हणूनच जयंत पाटील नागभीड येथे आले असताना या नेत्याला स्वतःच्या गाडीत बसवून चंद्रपूरपर्यंत घेऊन गेले. एवढेच नाही तर दुसऱ्या दिवशी या नेत्याच्या घरी तासभर खलबतेही केली.