शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

ग्रामीण भागातील चिमुकले रोवणीच्या कामात गुंतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 5:00 AM

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शेतीकामे तशी नवीन नाही. परंतु यावर्षी कोरोनामुळे शाळांना मार्च महिन्यांपासून सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे शेती मशागत, पीक पेरणी, जनावरे सांभाळणे आदी कामासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी पालकांना हातभार लावत आहे. यावर्षी जून महिन्याचा आरंभ चांगल्या पावसाने झाला. मात्र कोरोनाचे संकट आल्याने सर्वांनाच कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे.

ठळक मुद्देआई-वडिलांना मदत: शेती व्यवसायाचे धडे घेणे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खरीप हंगामात शेतकऱ्यांना पेरणीची कामे आणि विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षाची सुरूवात दोन्ही एकाच महिन्यात सुरु होते. मात्र यावर्षी शेतीकामे सुरु झाली. मात्र शाळांना अद्यापही सुटी असल्यामुळे सध्या ग्रामीण भागातील विद्यार्थीशेती कामात गुंतले आहे. अनेकजण आपल्या आई-वडीलांना शेतामध्ये मदत करीत आहे. या माध्यमातून शेतीव्यवसायाचे ते धडे घेत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात बघायचा मिळत आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शेतीकामे तशी नवीन नाही. परंतु यावर्षी कोरोनामुळे शाळांना मार्च महिन्यांपासून सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे शेती मशागत, पीक पेरणी, जनावरे सांभाळणे आदी कामासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी पालकांना हातभार लावत आहे.यावर्षी जून महिन्याचा आरंभ चांगल्या पावसाने झाला. मात्र कोरोनाचे संकट आल्याने सर्वांनाच कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. कोरोनाच्या सावटात पाऊस झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस, सोयाबीन तसेच धान पेरणी केली. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता अद्याप शाळा सुरू झाल्या नाही. विद्यार्थ्यांसाठी काही शाळांनी आॅनलाईन धडे देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मात्र ग्रामीण भागातील बहुतांश पालक तसेच विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन, संगणक व नेटवर्क यापैकी कोणतेही साधन नसल्याने हा प्रयोग यशस्वी होणार नसल्याचे बोलल्या जात आहे. कोरोनाच्या काळात परीक्षा न देताच विद्यार्थी वरच्या वर्गात पोहचले. मात्र आता शाळाच नसल्याने घरी राहून काय, करायचे या विचाराने अनेक विद्यार्थी आपल्या आई-वडीलांना शेतीकामात मदत करीत आहेत. जिल्ह्यात काही ठिकाणी रोवणीचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे विद्यार्थी सकाळपासून तर सायंकाळपर्यंत या कामात मदत करीत आहे.

टॅग्स :agricultureशेतीStudentविद्यार्थी