शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात २ हजार ४०४ नागरिकांचा नियमांना ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 05:00 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील मागील काही दिवसामध्ये मोठ्या संख्येने रुग्ण संख्या वाढली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत पंधराशेच्यावर रुग्ण संख्या गेली आहे. यातही महापालिका क्षेत्रामध्ये हा आकडा मोठा आहे. त्यामुळे यावर प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनासह महापालिका प्रशासनानेही आता कठोर पाऊल उचलने सुरु केले आहे. या अंतर्गत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन न करणे, तोंडाला मास्क न लावता शहरात फिरणे अशा बेफीकरी नागरिकांमुळे रुग्णसंख्या वाढत आहे.

ठळक मुद्देचार लाखांवर दंड वसुल : सार्वजनिक नियमांची ऐशीतैसी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांमध्ये शहरात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळले आहे. यावर प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासनाने काही निर्बंध घातले असून विविध उपाययोजनाही सुरु केल्या आहेत. असे असले तरी काही नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. रस्तावर थुंकणे, मास्क न बांधणे, खर्रा विक्री करणे, विना परवाना दुकान चालविणे आदी कारनामे सुरुच ठेवल्यामुळे महापालिका प्रशासनाने यावर आळा घालण्यासाठी दंडात्मक कारवाई सुरु केली आहे. यामध्ये २ हजार ४०४ नागरिकांकडून ४ लाख ९३ हजार ८९० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील मागील काही दिवसामध्ये मोठ्या संख्येने रुग्ण संख्या वाढली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत पंधराशेच्यावर रुग्ण संख्या गेली आहे. यातही महापालिका क्षेत्रामध्ये हा आकडा मोठा आहे. त्यामुळे यावर प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनासह महापालिका प्रशासनानेही आता कठोर पाऊल उचलने सुरु केले आहे. या अंतर्गत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन न करणे, तोंडाला मास्क न लावता शहरात फिरणे अशा बेफीकरी नागरिकांमुळे रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे त्यांच्यावर दंड ठोठावून प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, शहरातील काही व्यावसायिकही मनपाने आखून दिलेल्या उपाययोजनाकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे या व्यापाऱ्यांवरही मनपाने आपले लक्ष केंद्रीत केले आहे. दुकानदार, प्रतिष्ठाने तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर थेट कारवाई केली जाणार आहे.सदर कारवाई सहाय्यक आयुक्त शितल वाकडे, धनंजय सरनाईक, विद्या पाटील यांच्या नेतृत्वात झोनचे क्षेत्रीय अधिकारी भाऊराव सोनटक्के, नरेंद्र बोभाटे, सुभाष ठोंबरे, अतिक्रमण विभागाचे राहुल पंचबुद्धे, नामदेव राऊत तसेच स्वच्छता निरीक्षक प्रदीप मडावी, उदय मैलारपवार, भुपेश गोठे, विवेक पोतनुरवार, महेंद्र हजारे, अनिरुद्ध राजुरकर, अनिल ढवळे, संतोष गर्गेलवार, जगदीश शेंदरे यांच्याद्वारे कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी प्रत्येक प्रभागात पथक तैनात करण्यात आले आहे. दंड करण्याची कारवाई सातत्याने सुरु राहणार असून सुरक्षिततेसाठी मास्क लावावे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या