कोरोना संसर्गाची साखळी खंडित करणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 05:00 AM2020-07-08T05:00:00+5:302020-07-08T05:00:51+5:30

गडचांदूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळके यांनी नगरपरिषद अंतर्गत आतापर्यंत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना विषयक माहिती सादर केली. घरकुल योजना तसेच इतरही विकासात्मक योजना रखडू देऊ नये, घनकचऱ्यासाठी जागा उपलब्ध करण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करावी,अशा सूचना त्यांनी केल्या.

The chain of corona infection needs to be broken | कोरोना संसर्गाची साखळी खंडित करणे गरजेचे

कोरोना संसर्गाची साखळी खंडित करणे गरजेचे

Next
ठळक मुद्देनगरविकास राज्यमंत्री : गडचांदूर नगर परिषदेत कोरोना विषयक आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनीच उत्तम काम केले आहे. पुढच्या काळामध्ये देखील असेच काम ठेवून कोरोना संसर्गाची साखळी खंडित करणे गरजेचे आहे. कोरोनाचा उद्रेक होणार नाही यासाठी नियोजन करावे. अशा सूचना राज्याचे नगर विकास, ऊर्जा, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, आदिवासी विकास, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी गडचांदूर येथे दिल्यात. गडचांदूर नगर परिषदेत कोरोना विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते.
गडचांदूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळके यांनी नगरपरिषद अंतर्गत आतापर्यंत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना विषयक माहिती सादर केली.
घरकुल योजना तसेच इतरही विकासात्मक योजना रखडू देऊ नये, घनकचऱ्यासाठी जागा उपलब्ध करण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करावी,अशा सूचना त्यांनी केल्या.
यावेळी आमदार सुभाष धोटे, नगराध्यक्षा सविता टेकाम, नगर परीषदेचे उपाध्यक्ष शरद जोगी, उपविभागीय अधिकारी जे.पी लोंढे, तहसीलदार महेंद्र वाकलेकर, मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळके, राजेंद्र वैद्य तसेच नगरपरिषद, आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कोरपना तालुक्यात कोविड केअर सेंटर, बाहेरून येणाºया नागरिकांची आरोग्य तपासणी व नोंदणी, आरोग्य संदर्भातील सर्वेक्षण, कोरोना विषयक जनजागृती याविषयीची केलेली कार्यवाही तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांनी विषद केली.
आरोग्य विभागाने बाधितांवर करण्यात येणारे उपचार तसेच उपाययोजनांची माहिती दिली. आरोग्य विभागाने आणखी सक्षमपणे आरोग्य सर्वेक्षण करून बाहेरून येणाºया नागरिकांची नोंद करावी तसेच त्यांना अलगीकरणात ठेवण्याची सूचना ना. तनपुरे यांनी यावेळी आरोग्य विभागाला दिल्या.

विकासासाठी निधी मंजूर करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
गडचांदूर : गडचांदूर शहराच्या विकासासाठी निधी मंजूर करून शहर विकसित करावे, अशी मागणी कोरपना तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ना. प्राजक्त तनपुरे यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी घनकचरा व्यवस्थापनाकरिता गडचांदुर दोन हेक्टर जागा मंजूर करा, गडचांदुर ते आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करा, गुजरी बाजाराकरिता अन्न व नागरी पुरवठा विभागाचे गोडावून उपलब्ध करून द्यावे, आठवड़ी बाजारासाठी स्वतंत्र इमारत करा, प्रधानमंत्री शहरी आवास योजनेतून गडचांदुर ७७ घरकुल धारकांना उर्वरित हप्ता देण्याकरिता निधी उपलब्ध करून द्या, सार्वजनिक सभागृहाची निर्मिती करावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा नगर परिषद उपाध्यक्ष शरद जोगी, शहर अध्यक्ष नगरसेविका अश्विनी कांबळे, नगरसेविका मिनाक्षी एकरे आदी पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: The chain of corona infection needs to be broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.