शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्ही कॅमेरे लागले; पण वीज खांबांवर दिवेच नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:31 IST

जिवती : जिवती-शेणगाव मुख्य मार्गावर महावितरण विभाग व तहसील कार्यालय इमारतींसमोर सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहेत. मात्र वीज खांबांवर दिवेच ...

जिवती : जिवती-शेणगाव मुख्य मार्गावर महावितरण विभाग व तहसील कार्यालय इमारतींसमोर सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहेत. मात्र वीज खांबांवर दिवेच नसल्याने रात्रीच्या सुमारास या मार्गावर नागरिकांना रहदारीला अडचणी येत आहेत. मग सीसीटीव्ही कोणत्या कामाचे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मुख्य रस्त्यावरील वीज खांबांवर दिवे बसविण्यात यावेत, यासाठी ११ ऑगस्ट २०२१ ला नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्याकडे अर्ज करण्यात आला. त्याचा नोंदणी क्रमांक ९४९ असा आहे. परंतु आठवडा जाऊनही स्थानिक प्रशासनाला जाग आलेली नाही, असे दिसते. अर्ज करूनही कोणताही अधिकारी वा कर्मचारी पाहणी करायला आलेला नाही. स्थानिक नगर पंचायत प्रशासनाला सामान्य नागरिकांच्या समस्या दिसत नाहीत का, लोकप्रतिनिधी नसला, तर प्रशासन कामच करणार नाही का, असे प्रश्न जिवतीच्या नागरिकांना पडत आहेत. स्थानिक नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी अर्जाकडे लक्ष घालावे आणि वीज खांबांवर दिवे बसवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

180821\img_20210818_111252.jpg

तहसील समोरील पथ दिवे नसलेले खांब.