शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणातून चंद्रपुरात येतो गांजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 05:00 IST

घराची झडती घेतली असता, भींतीलगत गाद्याच्या मागे  दोन निळ्या रंगाच्या व एक पांढऱ्या रंगाची प्लास्टिक बोरी आढळून आली.  त्याला उघडून बघितले असता त्यामध्ये  खाकी कागदाच्या चौकोनी आकारात पॅक केलेले व प्लास्टिक दोरीने बांधून ओलसर पाने, फुले, व देठ हिरवट रंगाची ६९ किलो १८५ ग्रॉम वनस्पती आढळून आली. यावेळी पोलिसांनी गांजा व सर्व मुद्देमाल असा एकूण १० लाख ४१ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ठळक मुद्देराजुरा येथे एलसीबीची धाड : ७० किलो गांजा जप्त, चार अटकेत

  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दारुबंदीनंतर जिल्ह्यात आम्लपदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढत आहे. आम्लपदार्थाची तस्करी रोखण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करीत आहे. शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तेलंगणातून तस्करी केलेल्या गांजाची विक्री होणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजुरा येथील शिवाजी नगरातील सतीश तेलजिलवार याच्या घरी धाड टाकून आठ लाख ३० हजार २२० रुपये किंमतीचा ६९ किलो १८५ ग्राॅम उग्र वास असलेला ओला गांजा व इतर साहित्य असा एकूण  दहा लाख ४१ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन चार जणांना अटक केली. सतीश मुंडी उर्फ मोंडी तेलजिरवार (२२) रा. सोडो, ता. राजुरा, सुनील दादाजी मडावी (३८) रा. गडचांदुर, नजिरशहा शहेनशहा (४५) गडचांदुर, पुरुषोत्तम किष्टया जंजीर्ला (५७) रा. धोपटाळा ता. राजुरा असे अटकेतील आरोपींचे नाव आहे.चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी करण्यात आली. अनेकांनी पर्याय म्हणून गांजाचे सेवन सुरु केले. त्यामुळे जिल्ह्यात गांजा तस्करी वाढली आहे. शनिवारी तेलंगणातून तस्करी केलेल्या गांजाची राजुरा येथे विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजुरा येथील सतीश तेलजिलवार यांच्या घरी धाड टाकली. यावेळी घराची झडती घेतली असता, भींतीलगत गाद्याच्या मागे  दोन निळ्या रंगाच्या व एक पांढऱ्या रंगाची प्लास्टिक बोरी आढळून आली.  त्याला उघडून बघितले असता त्यामध्ये  खाकी कागदाच्या चौकोनी आकारात पॅक केलेले व प्लास्टिक दोरीने बांधून ओलसर पाने, फुले, व देठ हिरवट रंगाची ६९ किलो १८५ ग्रॉम वनस्पती आढळून आली. यावेळी पोलिसांनी गांजा व सर्व मुद्देमाल असा एकूण १० लाख ४१ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली.  ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरिक्षक संदीप कापडे, उपनिरीक्षक जितेंद्र बोबडे, पद्माकर भोयर, नितीन जाधव, राजेंद्र खनके, पंडित वऱ्हाडे, राजकुमार देशपांडे, मिलिंद चव्हाण, अनुप डांगे, जमीर पठाण, सुरेंद्र महतो, मनोज रामटेके, नितेश महात्मे, शेखर आसुटकर, जावेद सिद्दीकी, नितीन रायपुरे आदींनी केली.

टॅग्स :Drugsअमली पदार्थPoliceपोलिस