शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

तीन पिढ्यांच्या पुराव्याची अट रद्द करा

By admin | Updated: June 20, 2017 00:30 IST

जबरानजोत शेतकरी व अदिवासी शेतकऱ्यांना अशक्यप्राय असणारा ८५ वर्षांचा पुरावा मागणे हा त्यांचे न्याय हक्क नाकारण्याचा प्रकार असून...

वन जमिनीवरील अतिक्रमण : वामनराव चटप यांची केंद्र सरकारकडे मागणीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जबरानजोत शेतकरी व अदिवासी शेतकऱ्यांना अशक्यप्राय असणारा ८५ वर्षांचा पुरावा मागणे हा त्यांचे न्याय हक्क नाकारण्याचा प्रकार असून केंद्र सरकारने वनजमिनीवरील मालकी हक्क प्रस्थापित करण्यासाठी २००६ च्या कायद्यातील तीन पिढ्यांच्या पुराव्याची अट रद्द करण्यासाठी या कायद्यात सुधारणा करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय आदिवासी व समाजकल्याण मंत्री आणि केंद्रीय वने, पर्यावरण व ग्रामविकास मंत्री आदींकडे केली आहे.२००६ मध्ये केंद्र सरकारने अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी वनहक्क मान्यता अधिनियम पारित केला. या अधिनियमातील कलम २ (ण) मधील ‘इतर पारंपरिक वननिवासी’ या शब्दाच्या व्याख्येत तीन पिढ्यांच्या पुराव्याची अट सामील करण्यात आली आहे. तसेच ‘पिढी’ या शब्दाचा अर्थ २५ वर्षांचा कालखंड असे नमूद आहे. या व्याख्येत १३ डिसेंबर २००५ पूर्वी तीन पिढ्यांपासून मुख्यत्वे करून वनात राहणारा आणि उपजिविकेच्या खऱ्या गरजांसाठी वनावर किंवा वन जमिनीवर अवलंबून असणारा कोणताही सदस्य अथवा समाज, असा आहे. प्रत्यक्षात भारतीय वन कायदा १९२७ हा गोऱ्या इंग्रजांचे काळातील आहे. भारत सरकारने १९८० साली वनसंरक्षण कायदा पारित केला. त्याचे नोटिफिकेशन २७ डिसेंबर १९८० रोजी होऊन आता जवळपास ३५ वर्षे झाली आहेत. १३ डिसेंबर २००५ पासून मोजल्यास तीन पिढ्या म्हणजे ७५ वर्षे आणि २००५ ते २०१५ हा आजमितीचा काळ म्हणजे १२ वर्षे धरला तर ८७ वर्षांचा पुरावा द्यावा लागणार आहे. महाराष्ट्रात ग्रामपंचायतीची स्थापना १९५९ च्या कायद्यानंतर अथवा त्याचे आसपासच्या कालावधीत झाली आहे. आपल्या देशाचे संविधान लागू होऊन केवळ ६७ वर्षे झाली आहेत. त्यामुळे ७५ वर्षांच्या ३ पिढ्यांच्या पुराव्यावर आग्रही राहणे म्हणजे वनजमिनीवरील जबरानजोत शेतकऱ्यांना एकप्रकारे पट्टे नाकारण्याचाच प्रकार आहे.महाराष्ट्र राज्याने शेतकऱ्यांच्या कर्ज माफीची घोषणा नुकतीच केली आहे तसेच त्यांना दहा हजार रुपयाच्या तात्काळ मदत देण्याचे जाहीर केले आहे. परंतु, हे शेतकरी या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अयशस्वी ठरत आहेत. त्यामुळे तीन पिढ्यांची अट काढून टाकण्यात यावी आणि त्याखालील स्पष्टीकरणातील ‘पिढी’ याचा अर्थ २५ वर्षांचा कालखंड हेही वगळणे गरजेचे आहे. हा बदल तातडीने करावा आणि जबरानजोत शेतकऱ्यांना जमिनीचे मालक करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अ‍ॅड. चटप यांनी केली आहे.