शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी मोहीम

By admin | Updated: July 10, 2014 23:30 IST

अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी अधिनियमाअंतर्गत वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी आता खुद् जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनीच कंबर कसली आहे. यासाठी एक वेळापत्रक

मोहिमेचा प्रारंभ : जिल्हाधिकाऱ्यांनी कसली कंबरचंद्रपूर : अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी अधिनियमाअंतर्गत वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी आता खुद् जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनीच कंबर कसली आहे. यासाठी एक वेळापत्रक निश्चित केले असून ही मोहिम सुवर्ण जयंती राजस्व अभियानाचा भाग म्हणून जिल्हाभर राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा आज १० जुलैपासून शुभारंभही करण्यात आला आहे. जिल्ह्यात अनेक गावातील वनहक्क दावे प्रलंबित आहेत. यासाठी वेळोवेळी आंदोलने करण्यात आले आहे. आतापर्यंत याबाबतची कार्यवाही मंद गतीने सुरू होती. मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांनी ही कामे जलदगतीने निकाली काढण्यासाठी एक कार्यक्रमच जाहीर केला आहे. त्यानुसार ग्राम पातळीवर प्राप्त झालेल्या दाव्यांची छाननी करून ग्राम वनहक्क समिती पात्र दावे २५ जुलै २०१४ पर्यंत संबंधित ग्रामसभेकडे सादर करणार आहेत. नामंजूर केलेल्या दावेदारांना ग्राम वनहक्क समिती लेखी स्वरुपात कळवतील. गावात एकही दावा शिल्लक राहणार नाही, याची संबधित ग्राम वनहक्क समितीने दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आहे. गावात एकही दावा सादर करावयाचा शिल्लक नसल्याबाबतचे प्रमाणपत्र संबंधित वनहक्क समितीला तहसीलदार यांच्याकडे सादर करावे लागणार आहे.तहसील कार्यालयातून प्राप्त दाव्यांना सोबत दिलेला नमुना अ लावण्याची कार्यवाही संबंधित वनविभाग ८ आॅगस्ट २०१४ पूर्वी पूर्ण करून त्याच दिवशी दावे संबंधित तहसील कार्यालयात सादर करतील. या आधी संबंधित तहसील कार्यालयाने पाठविलेले दावे प्रलंबित असेल तर सदर दावेसुद्धा या तारखेपर्यंत निकाली काढावयाचे आहे, असे वनविभागाला सांगण्यात आले आहे. वनविभागाकडून प्राप्त झालेले दावे संबंधित तहसीलदार १० आॅगस्ट २०१४ रोजी उपविभागीय समितीकडे मंजुरीकरिता दाखल करतील.तहसीलदारामार्फत प्राप्त झालेल्या दाव्यांची छाननी करून सदर दाव्यावर निर्णय घेण्याकरिता १२ आॅगस्ट २०१४ रोजी उपविभागीय स्तरीय समितीची बैठक घेतील व मंजूर झालेले दावे जिल्हास्तरीय समितीकडे त्याच दिवशी दाखल करतील. उपविभागीयस्तरीय समितीकडून मंजूर झालेल्या दाव्यांची छाननी करून सदर दाव्यावर निर्णय घेण्याकरिता १४ आॅगस्ट २०१४ रोजी जिल्हा स्तरीय समितीची बैठक आयोजित करून सदर दावे निकाली काढले जाणार आहेत. (शहर प्रतिनिधी)ृ