नरभक्षक वाघाला पिंजरे लावून पकडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:35 IST2021-07-07T04:35:06+5:302021-07-07T04:35:06+5:30

तळोधी बा. वनपरीशेत्रातील कक्ष क्र. ६९१ मध्ये महिनाभरापूर्वी नागभीड तालुक्यातील आकापूर येथील गुराखी खटू भानू कुंभरे (६७) यांनी ...

Cage a man-eating tiger | नरभक्षक वाघाला पिंजरे लावून पकडा

नरभक्षक वाघाला पिंजरे लावून पकडा

तळोधी बा. वनपरीशेत्रातील कक्ष क्र. ६९१ मध्ये महिनाभरापूर्वी नागभीड तालुक्यातील आकापूर येथील गुराखी खटू भानू कुंभरे (६७) यांनी जनावरे चरावयास नेले असता, वाघाने हल्ला करून जागीच ठार केले. याच परिसरात कक्ष क्र. ७०३ मध्येसुद्धा नागभीड तालुक्यातील वाढोणा येथील गुराखी रमेश जैराम वाघाडे(४२) यांनासुद्धा वाघाने हल्ला करून ठार केले. आठ दिवसांपूर्वी तळोधी बा.येथील मुकेश मदनकर यांच्या गोऱ्ह्यावरसुद्धा वाघाने हल्ला करून ठार केले. अशाप्रकारे वारंवार वाघाकडून हल्ला होत असल्याने जंगलालगत शेतशिवारात जाणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. दिवसभर महिला व पुरुष शेतात काम करताना वाघाच्या भीतीने जीव मुठीत ठेवून कामे करावे लागत आहेत, त्यामुळे वन विभागाने या परिसरात पिंजरे लावून नरभक्षक वाघ पकडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Cage a man-eating tiger