शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरीच्या मध्यवर्ती परिसरात घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 06:00 IST

येथील राजेश्वर विधाते हे मंगळवारला रात्री ८ वाजेच्या सुमारास कुटुंबबियासह बाहेरगावी गेले. घरी कुणीही नसल्याचा फायदा घेऊन चोरटयांनी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास राजेश्वर विधाते यांच्या रुक्मिणीनगर स्थित असलेल्या घराचे दरवाजे तोडून घरात प्रवेश केला. घरातील दुचाकी व २० हजार रुपये लंपास केले. विशेष म्हणजे, सदर चोरटयाने स्वत:चे कपडे, जोडे व जॅकेट चोरी केलेल्या ठिकाणी काढून ठेवले आणि त्या घरच्या मुलाचे जॅकेट व कपडे घालून चोरटे निघून गेले.

ठळक मुद्देचोरट्यांनी कपडेही बदलले : दुचाकीसह २० हजार लंपास

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : शहरातील मध्यवर्ती पेठवार्डातील रुक्मिणीनगर भागातील भरवस्तीत मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी घर फोडून होंडा कंपनीची शाईन दुचाकी व नगदी २० हजार रुपये लंपास केले. तसेच चोरटयाने स्वत:चे कपडे, जोडे व जॅकेट काढून ठेवून फोडलेल्या घरच्या मुलाचे जॅकेट व कपडे घालून निघून गेले. त्यामुळे पुरावा सोडून चोरटयांनी घरफोडी केल्याची विचित्र घटना ब्रम्हपुरीत घडली.येथील राजेश्वर विधाते हे मंगळवारला रात्री ८ वाजेच्या सुमारास कुटुंबबियासह बाहेरगावी गेले. घरी कुणीही नसल्याचा फायदा घेऊन चोरटयांनी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास राजेश्वर विधाते यांच्या रुक्मिणीनगर स्थित असलेल्या घराचे दरवाजे तोडून घरात प्रवेश केला. घरातील दुचाकी व २० हजार रुपये लंपास केले. विशेष म्हणजे, सदर चोरटयाने स्वत:चे कपडे, जोडे व जॅकेट चोरी केलेल्या ठिकाणी काढून ठेवले आणि त्या घरच्या मुलाचे जॅकेट व कपडे घालून चोरटे निघून गेले. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. बाजुच्या नागरिकाला घरात चोरी झाल्याचे कळताच त्यांनी बाहेरगावी गेलेल्या घर मालकाला भ्रमणध्वनीवरून याची माहिती दिली.माहिती मिळताच सदर कुटुंब ताबडतोब ब्रह्मपुरीला पोहोचले आणि एकंदरीत परिस्थिती पाहून ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी चंद्रपूरवरून श्वानपथकाला व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सय्यद व अमोल गिरडकर करीत आहेत.

टॅग्स :Thiefचोर