शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

घुग्घुसमध्ये भरदिवसा घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:24 IST

घुग्घुस : येथील साईनगरमधील राधाकृष्ण मंदिर परिसरातील पाऊल नारायण जंगम यांच्या घरी कोणीही नसल्याचा फायदा घेत भरदिवसा घरात प्रवेश ...

घुग्घुस : येथील साईनगरमधील राधाकृष्ण मंदिर परिसरातील पाऊल नारायण जंगम यांच्या घरी कोणीही नसल्याचा फायदा घेत भरदिवसा घरात प्रवेश करून घरातील कपाटाचे कुलूप तोडून तीन लाख ८१ हजार ५०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. ही घटना शनिवारी दुपारी घडली.

साईनगरमधील पाऊल जंगम हे वेकोलिचे कर्मचारी असून, ते कर्तव्यावर गेले होते. त्याची पत्नी बाहेर गेली, तर दोन वाजता मुलगाही काही कामानिमित्त घराबाहेर गेला होता. घरी कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यानी घरात प्रवेश करून आतील कपाटाचे कुलूप तोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख ५३ हजार असा एकूण तीन लाख ८१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. त्यांनी घुग्गुस पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.

फिर्यादीच्या तक्रारी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम ४५४, ३८० गुन्हा नोंद करून गुन्हे शोध पथकाचे सहायक फौजदार गौरीशंकर आमटे, सचिन बोरकर, महेंद्र वन्नकवार, सुधीर मत्ते, रंजित भुरसे, मनोज धकाते, प्रकाश करमे, सचिन डोहे, रवी वाभीटकर नितीन मराठे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. घटनेचा पुढील तपास पो.नि. राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात सहा.पो.नि. संजय सिंग कसून तपास करीत आहेत.