शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

राजुऱ्याच्या सोनियानगरातील घरांवर चालला बुलडोजर!

By admin | Updated: April 30, 2015 01:25 IST

येथील नगर परिषदेच्या हद्दीमधील सोनिया नगर वॉर्डात मागील अनेक वर्षापासून झोपड्या बांधून वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या घरावर बुधवारी रखरखत्या उन्हात बुलडोजर चालला.

राजुरा : येथील नगर परिषदेच्या हद्दीमधील सोनिया नगर वॉर्डात मागील अनेक वर्षापासून झोपड्या बांधून वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या घरावर बुधवारी रखरखत्या उन्हात बुलडोजर चालला. यावेळी अनेक गरीब, महिला, पुरुष, मुले अतिक्रम काढू नका, यासाठी विणवणी करीत होते. मात्र नगर परिषदेचा ताफा कुणाचेही ऐकायला तयार नव्हता. पोलीस यंत्रणाही जास्तीची तत्परता दाखविताना नागरिकांनी अतिक्रमण हटविण्यास विरोध केला. तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वॉर्डवासींना शिवीगाळ केल्याने प्रकाश खडसे नामक व्यक्तीने स्वत:वर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बुधवारच्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे शेकडो सोनिया नगरचे नागरिक बेघर झाले आहेत. त्याच्या घरावर बुलडोजर चालताना, कष्टाने बांधलेला आशियाना उध्वस्त होताना उघळ्या डोळ्याने बघितला. मात्र शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण असताना त्यांना हात न लावता सोनियानगर मधीलच अतिक्रमण हटविण्यासाठी सर्व महसूल आणि पोलीस अधिकारी तत्परतेने संसार उध्वस्त करताना दिसले. सोनियानगर येथील दलित नागरिक प्रकाश खडसे यांनी आधी सर्वे क्रमांक १४९ मधील अतिक्रमण हटवा नंतर आमची घरे पाडा, असे म्हणताच काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शिवीगाळ केली. त्यामुळे खडसे यांनी झोपड्या पाडू नका, असे म्हणत अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र त्याला पोलिसांनी अटक केली. राजुरा शहराच्या शेवटच्या टोकावरील सोनिया नगरामध्ये गरीबाचे संसार उध्वस्त करण्याचा डाव सुरू होता. तेव्हा दोन नगरसेवक वगळता एकही नेता उपस्थित नव्हता. (शहर प्रतिनिधी)शेकडो अतिक्रमणे केव्हा हटविणार ? राजुरा शहरात सर्वे क्रमांक १४९ मध्ये शेकडो अतिक्रमण आहेत. लाखो रुपये घेऊन सरकारी जागा विकत घेण्याचा प्रकारही सुरू आहे. मग तेथील अतिक्रमण काढण्याची शासकीय अधिकाऱ्यांमध्ये धमक आहे काय, असा संतप्त प्रश्न सोनियानगरवासी करीत आहे.कारवाई राजकीय द्वेषातूननगर परिषद राजुराच्या सेवा केंद्र व बगीच्या बनविण्यासाठी येथील नागरिकांची बांधलेली घरे पाडण्यात आली. मग राजुरा शहरात करोडो खर्च करून बगीचे निर्माण करण्यात आले, ते नंतर नष्ट झाले. त्या जागेवरील अतिक्रमण का हटवत नाही. केवळ राजकीय द्वेषातून ही कारवाई केल्याचे बोलल्या जात आहे.