शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपुरात झोपड्यांवर चालला बुलडोजर

By admin | Updated: April 8, 2016 00:54 IST

बल्लारपूर तहसील अंतर्गत विसापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत महसूलच्या जागेवर भिवकुंड परिसरात अनेकांनी अनधिकृत झोपड्या तयार केल्या.

बल्लारपूर तहसीलची कारवाई : पक्के बांधकाम पाडण्यासाठी आग्रहबल्लारपूर : बल्लारपूर तहसील अंतर्गत विसापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत महसूलच्या जागेवर भिवकुंड परिसरात अनेकांनी अनधिकृत झोपड्या तयार केल्या. शासकीय जमिनीवर अतिक्रमण हटवित झोपड्यांवर बुलडोजर चालविला. ही कारवाई गुरुवारी दुपारी १.३० वाजता तहसील प्रशासनाने केली. दरम्यान या ठिकाणी पक्के बांधकाम उदध्वस्त करण्यात यावे म्हणून नागरिकांनी तहसील प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घेराव केला. दोन दिवसात पक्के बांधकाम जमिनदोस्त करण्याचे आश्वासन तहसीलदार विकास अहीर यांनी दिले आहे.बल्लारपूर तलाठी साज्यातील सर्व्हे क्रमांक १०५ च्या जागेवर काही दिवसांपासून एका इसमाने अवैधरित्या अतिक्रमण करुन जागा बळकावण्याचा प्रयत्न चालविला होता. माझीच जागा म्हणून नोटरी करुन विकण्याचा गोरखधंदा सुरु केला होता. याचा सुगावा विसापूर येथील नागरिकांना लागला. या इसमाचा बेत उधळून लावण्यासाठी विसापूर येथील नागरिकांनी अतिक्रमण करुन झोपड्या उभारल्या. विसापूरच्या हद्दीतील जागा विसापूरकरांना घरे बांधण्यास मिळावी म्हणून गावातील ५० हून अधिक नागरिकांनी सदर जागेवर अतिक्रमण करण्यास आठ दिवसांपासून सुरुवात होती. सर्व्हे क्र. १०५ च्या जागेवर अतिक्रमणधारकांची संख्या वाढत गेल्याने महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन तक्रारीने जर्जर झाले. या संदर्भात उपविभागीय अधिकारी कल्पना निळ यांच्याकडे तक्रार करण्यात आली. त्यांच्या आदेशान्वये तहसील प्रशासनाने अतिक्रमणधारकांवर अतिक्रमण काढण्यासंदर्भात नोटीस बजावली. यातील काहीने महसूल प्रशासनाला सहकार्य करुन अतिक्रमण काढून सहकार्य केले. मात्र काहींनी प्रशासनाच्या नोटीसला न जुमानता अतिक्रमण कायम ठेवले. परिणामी महसूल प्रशासनाने पोलिसांचा ताफा घेवून अतिक्रमणधारकांच्या झोपड्यावर बुलडोजर चालविला.दरम्यान, संस्थेचे नाव पुढे करुन व सर्वसामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या व जागा हडपण्याच्या बेतात असलेल्या इसमाचे तेथील पक्के बांधकाम आजच्या कारवाईत कायम ठेवल्याने गावकऱ्यांत नाराजी निर्माण झाली. तहसील प्रशासनाने पक्के बांधकाम हटविण्यास दिरंगाई केल्यास अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. (शहर प्रतिनिधी)