एक लाख ८७ हजार ५०० रुपयांचे बोगस बियाणे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:36 IST2021-06-09T04:36:10+5:302021-06-09T04:36:10+5:30

जिवती : शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाला सुरुवात झाली असून, शेतकरी पेरणीच्या कामाला लागले आहेत, त्यातच काही संधीसाधू व्यापारी व दलालांनी ...

Bogus seeds worth Rs 1 lakh 87,500 seized | एक लाख ८७ हजार ५०० रुपयांचे बोगस बियाणे जप्त

एक लाख ८७ हजार ५०० रुपयांचे बोगस बियाणे जप्त

जिवती : शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाला सुरुवात झाली असून, शेतकरी पेरणीच्या कामाला लागले आहेत, त्यातच काही संधीसाधू व्यापारी व दलालांनी अनधिकृत बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारुन लाखो रुपयांची माया गोळा करण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. याची माहिती मिळता पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पुनागुडा गावाजवळ पोलिसांनी एक लाख ८७ हजार ५०० रुपयांचे बोगस बियाणे जप्त केले.

गोपनीय माहितीवरून पोलिसांनी झायलो ( क्र.एम एच ३४ ए ए २१५१) गाडीला थांबवून तपासणी केली असता, त्यात बिल्ला नामक लेबल असलेले एकूण २५० बॅग बियाणे आढळून आले. यात वाहनचालक प्रकाश गोपीचंद चव्हाण ( ३८ ) रा. डोंगरगाव याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक निलम डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरिक्षक जमील शेख, रमाकांत कामडी, गुंडेराव पोले, परमवीर खोबरे, निखिल ठाकरे प्रमेश्वर गडदे यांनी केली.

===Photopath===

070621\img-20210607-wa0152.jpg

===Caption===

जप्त करण्यात आलेले बोगस बियाणे

Web Title: Bogus seeds worth Rs 1 lakh 87,500 seized