शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

सराफा बाजाराचे कोट्यवधींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:00 IST

नागपूर पाठोपाठ चंद्रपुरात दागिन्यांची हौस करणारे ग्राहक मोठ्या प्रमाणात आहेत. या बाजारपेठेतून दररोज तयार दागिन्यांबरोबर चांदीही मोठ्या प्रमाणात विकली जाते. दरवर्षी जानेवारी महिन्यापासूनच वधू-वरांसाठी दागिने बनविण्यासाठी काही रक्कम सराफांना देवून जाण्याची प्रथा चंद्रपुरात आहे. जिल्ह्यात साखरपुढ्यानंतर दागिन्यांसाठी दर महिना ठराविक हप्ता देवून शेवटचा हप्ता माफ करून सोने घेण्याची परंपरा आहे.

ठळक मुद्देविवाह सोहळे लांबणीवर : लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप् प

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लॉकडाऊनमध्ये अर्धी लग्नसराई गेल्याने सराफ व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबरोबरच या व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेक उपव्यावसायिकांचे आणि मजूर वर्गाचेही नुकसान झाले आहे. चंद्रपूर शहरात दररोज होणारी कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे.नागपूर पाठोपाठ चंद्रपुरात दागिन्यांची हौस करणारे ग्राहक मोठ्या प्रमाणात आहेत. या बाजारपेठेतून दररोज तयार दागिन्यांबरोबर चांदीही मोठ्या प्रमाणात विकली जाते. दरवर्षी जानेवारी महिन्यापासूनच वधू-वरांसाठी दागिने बनविण्यासाठी काही रक्कम सराफांना देवून जाण्याची प्रथा चंद्रपुरात आहे. जिल्ह्यात साखरपुढ्यानंतर दागिन्यांसाठी दर महिना ठराविक हप्ता देवून शेवटचा हप्ता माफ करून सोने घेण्याची परंपरा आहे. यंदा ही परंपरादेखील खंडित झाल्याचे दिसून आले आहे. गुढीपाडव्याला उलाढाल होऊ शकली नाही आणि आता कोरोनाच्या भितीन ेसंचारबंदी पाळत अनेकांनी आपला विवाह सोहळा पुढे ढकलला आहे. याचा सर्वाधिक परिणाम सराफ बाजारावर झालेला दिसून येत आहे. यातून कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे.कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नलॉकडाऊनमुळे सराफ व्यावसायिकांचा व्यवहार थांबला आहे. लॉकडाऊनमुळे व्यवसाय पूर्णत: कोलमडला आहे. व्यावसायिकांसह बाजारपेठेत जवळपास दीडहजार कामगार आहेत. त्यांची रोजीरोटीही थांबली आहे. काही दिवसांपूर्वी सुवर्णकारांनी आपल्या मजुरांना, कारागिरांना काही प्रमाणात अन्नधान्याची मदत केली आहे. परंतु आता यापुढे त्यांच्या दैनंदिन गरजा भागवणे अवघड आहे.बँकांचे कर्ज भरण्यास येणार अडचणीकोरोनामुळे मागील १७ दिवसात शहरात २५ कोटींचा व्यवहार ठप्प झाला आहे. या सराफापैकी अनेक व्यावसायिकांनी बँकाकडून व्यवसायासाठी कर्ज घेतले आहे. सरकारने सूचना दिल्यानंतरही या व्यावसायिकांना हप्ते भरण्याबाबत बँकांकडून सांगितले जात आहे. पुढील मंदीकाळात या व्यवसायाला दिलासा देण्यासाठी सरकारने सवलतीच्या योजना जाहीर करून त्या प्रामाणिकपणे राबविण्याची मागणी व्यावसायिकांनी केली आहे.

टॅग्स :Marketबाजार