शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी ट्रकवर धडकली; मुलगा ठार, आई जखमी

By admin | Updated: May 8, 2015 01:16 IST

दहाचाकी ट्रकला दुचाकी वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वाहनावरस्वार ३० वर्षीय मुलगा जागीच ठार तर आई गंभीररित्या जखमी झाली.

वरोरा : दहाचाकी ट्रकला दुचाकी वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वाहनावरस्वार ३० वर्षीय मुलगा जागीच ठार तर आई गंभीररित्या जखमी झाली. सदर अपघात नागपूर-चंद्रपूर मार्गावरील मजरा गाव शिवारात दुपारी ३.३० वाजता सुमारास घडला. अपघात एवढा भयंकर होता की, अपघातग्रस्त ट्रकला क्रेनच्या सहाय्याने उचलून दुचाकी वाहन व मृतदेह बाहेर काढावे लागले. राजेंद्र नानाजी सालेकर (३०) असे मृताचे नाव आहे. तर आई कान्हुपात्रा नानाजी सालेकर (५०) या गंभीर जखमी आहेत. राजेंद्र हा एम.एच. ३२ यु. ९८८४ या क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने आईसोबत वरोरा येथून जामखुळा गावाकडे जात होते. दरम्यान नागपूर- चंद्रपूर मार्गावर मजरा नजीकच्या बी.एस. कंपनीकडे जाणाऱ्या एम.एम. २९ टी २०४४ या क्रमांकाच्या दहाचाकी ट्रकने वळन घेतले. त्यावेळी दुचाकी ट्रकवर धडकली. त्यात दुचाकी वाहनावरील राजेंद्र सालेकर हे जागीच ठार झाले. तर त्याची आई कान्हुपात्रा सालेकर या गंभीररित्या जखमी झाल्या. जखमीवर वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर चंद्रपूर येथे हलविण्यात आले. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे. मृत राजेंद्रचा दोन दिवसांवर विवाह होणार होता. त्यामुळे तो पत्रिका वाटप व इतर कामासाठी वरोरा येथे आला होता, हे विशेष. (तालुुका प्रतिनिधी)विवाह मंडपात शोकराजेंद्र सालेकरचा ९ मे रोजी यवतमाळ जिल्ह्यातील रुंझा गावातील एका युवतीसोबत जामखुळा येथे विवाह होणार होता. पत्रिका वाटप व इतर कामासाठी राजेंद्र वरोरा येथे आला होता. तर त्याच्या आप्तेष्टांनी घरी विवाह सोहळ्यासाठी मंडप उभारण्याचे काम सुरू केले होते. अपघातात राजेंद्र मरण पावल्याची वार्ता घरी पोहचताच मंडप अर्धवट सोडून वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात आप्तेष्टांनी धाव घेतली. त्यानंतर विवाह मंडपातील वातावरण शोकाकूल झाले.