शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात सापांपासून सावधान; चंद्रपूर जिल्ह्यात विषारी सापांच्या केवळ चार प्रजाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 05:00 IST

जिल्ह्यात मान्सून दाखल झाला आहे. पावसाळा सुरू होण्याच्या काळात बऱ्याच जातींच्या सापांचा प्रजनन काळ असतो. पावसाळ्यात जमिनीत लपून बसलेले जीवजंतू बाहेर पडतात, तसेच दुसऱ्या प्राण्यांनी तयार केलेल्या बिडात राहणारे सापसुद्धा भक्ष्य मिळविण्यासाठी व सुरक्षित जागेचा शोध घेण्यासाठी बाहेर येतात. सापांविषयी अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत; परंतु सर्वच साप हे विषारी नसतात. 

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या मित्राचे संरक्षण करा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात साप, विंचू यांसारखे सरपटणारे प्राणी मोठ्या प्रमाणात आढळून येतात. चंद्रपूर जिल्ह्यात केवळ विषारी सापांच्या चारच प्रजाती आढळून येतात. त्यामुळे साप आढळल्यानंतर घाबरुन त्याला मारु नये, सर्पमित्राला बोलवावे, असे आवाहन सर्पमित्रांकडून होत आहे. जिल्ह्यात मान्सून दाखल झाला आहे. पावसाळा सुरू होण्याच्या काळात बऱ्याच जातींच्या सापांचा प्रजनन काळ असतो. पावसाळ्यात जमिनीत लपून बसलेले जीवजंतू बाहेर पडतात, तसेच दुसऱ्या प्राण्यांनी तयार केलेल्या बिडात राहणारे सापसुद्धा भक्ष्य मिळविण्यासाठी व सुरक्षित जागेचा शोध घेण्यासाठी बाहेर येतात. सापांविषयी अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत; परंतु सर्वच साप हे विषारी नसतात. सापाला शेतकऱ्याचा मित्र, असे संबोधले जाते; परंतु साप दिसताच घाबरुन त्या सापाला मारले जाते; परंतु सर्वच साप हे विषारी नसतात. आपल्याकडे साधारणत: नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे या चारच प्रजातींचे विषारी साप आढळून येतात. तर इंडियन एग्ज, श इटर, माजऱ्या ही निमविषारी तर बहुतांश साप बिनविषारी आढळून येतात; परंतु दरवर्षी भीती व अंधश्रद्धेमुळे अनेक बिनविषारी सापांना जीव गमवावा लागतो.शेतात किंवा काडीकचरा असलेल्या तसेच ओलावा असणाऱ्या ठिकाणी काम करताना सांभाळून काम करावे, जोपर्यंत सापाला इजा होत नाही. तोपर्यंत तो कुणालाही दंश करीत नाही, त्यामुळे साप दिसताच त्याला न मारता सर्पमित्राला बोलवावे किंवा विषारी साप असेल तर वनविगाला माहिती देवून शेतकऱ्याच्या मित्राचे रक्षण करावे, असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.

साप आढळला तरशेतात, काडीकचरा असलेल्या ठिकाणी, छोटे-छोटे बिड असणाऱ्या ठिकाणी साधारणत: साप आढळून येतात. साप दिसल्यानंतर लगेच घाबरुन न जाता, सर्पमित्राला प्राचारण करावे, सर्पमित्र येईपर्यंत त्याच्याकडे लक्ष ठेवावे. आपल्या समोर एकाच साप असेल तर एकाच जागी स्थिर राहावे, त्याचे लक्ष विचलित करण्यासाठी त्याच्या बाजूला एखादी वस्तू फेकावी. जेणेकरुन त्याचे लक्ष विचलीत होईल. सर्पमित्र येईपर्यंत त्याच्याकडे लक्ष ठेवावे.

नाग : नागाचे विष सर्वात जहाल असते. नाग ओळखण्याची सर्वात मोठी खूण म्हणजे त्याचा फणा. नागाच्या फण्याच्या मागील बाजूस दहा किंवा शुन्याचा आकडा असतो. काळ्या किंवा तपकिरी रंगाचे नाग जास्त आढळून येतात.मण्यार : मण्यार किंवा मनेर ही भारतात आढळणारी विषारी प्रजात आहे. मण्यार सापाचे विष नागासारखेच असते. साधारणत: हा साप जंगल परिसरात आढळून येतो. सापाचा रंग पोलादी निळा असून अंगावर पांढरे खवले असतात. हे खवले शेपटीकडे अधिक व डोक्याकडे कमी- कमी होत जातात.घोणस : घोणस सापाचे विष अतिशय जहाल असते. या सापाच्या अंगावर साखळीसारख्या, तीन समांतर रेषा असतात. घोणस, हिरवा, पिवळा, हलका करडा रंग, व इतर अनेक रंगछटामध्ये आढळतो.फुरसे : हा साप ग्रामीण भागात फरुड या नावाने ओळखला जातो. यांचा रंग तपकिरी, फिक्कट पिवळसर किंवा वाळूसारखा असतो. पाठीच्या दोन्ही बाजूवर एकेक, फिक्कट पांढरी नागमोडी रेषा असते. 

साप चावला तरसर्वदंश झाल्यानंतर सापाच्या विषाने मृत्यू होण्यापेक्षा घाबरुन जास्त मृत्यू होत असल्याची उदारणे आहेत. परंतु, साप चावल्यानंतर घाबरुन न जाता ज्या ठिकाणी दंश झाला असेल. त्या ठिकाणाहून साधारण तीन ते चार इंच अंतरावर आवळपट्टी बांधावी. कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला बळी पडून मांत्रिकाकडे जावू नये, आपल्या परिसरातील डॉक्टरांकडे जावून त्वरीत उपचार घ्यावा.

नुकताच पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. गांव-खेड्यासह शहरी भागात साप निघण्याचे प्रमाण वाढले आहे. साप निघाल्यास आपल्या संपर्कातील सर्परक्षक,-सर्पमित्र यांना बोलवावे. सापाची माहिती नसेल तर पकडण्याचा किंवा हुसकावण्याचा प्रयत्न करू नये. सर्पदंश झाल्यास घाबरून न जाता, आवश्यक प्रथमोपचार करा, बुवाबाजी, मांत्रिक किंवा गावठी उपचारात वेळ घालवू नका. सर्पदंशावर शासकीय रुग्णालयात ‘प्रति सर्प विष' उपलब्ध असते. त्यामुळे लगेच प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा नजिकच्या रुग्णालयात जावे. प्रत्येक साप विषारी नसतो, आपल्यास झालेला सर्पदंश बिनविषारी सापाचा असू शकतो.बंडू धोतरे,  अध्यक्ष इको-प्रो तथा सर्पमित्र

 

टॅग्स :snakeसाप