शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

फुकटात जाहिरात कराल तर खबरदार !

By admin | Updated: February 4, 2015 23:11 IST

एसटी महामंडळाला प्रवाशांसोबत प्रसार, प्रचाराच्या माध्यमातून उत्पन्न मिळते. परंतु, काही फुकटे उत्पादक आपल्या वस्तूंचा प्रचार करण्यासाठी एसटीचा आश्रय घेतात.

चंद्रपूर : एसटी महामंडळाला प्रवाशांसोबत प्रसार, प्रचाराच्या माध्यमातून उत्पन्न मिळते. परंतु, काही फुकटे उत्पादक आपल्या वस्तूंचा प्रचार करण्यासाठी एसटीचा आश्रय घेतात. त्यामुळे एसटी विद्रुप तरच होतेच, प्रवाशांना हे कृत्य करीत असताना विनाकारण त्रासही होतो. यापुढे फुकटात जाहिरात करणे महागात पडणार आहे. यासाठी एसटी महामंडळ विनापरवानगी जाहिराती लावणाऱ्यांना पकडून जवळच्या पोलिस ठाण्यात हवाली करणार आहे. या संबंधीचे आदेश काढण्यात आले असून त्यावर सरकारी मालमत्ता विद्रुप केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे. ‘लोकमत’ ने एसटी बसगाड्याचे विद्रुपीकरण थांबणार का? असे वृत्त प्रकाशित केले होते. यासाठी आगाराने खास पथकाची निर्मिती केली आहे. पथक प्रत्येक तालुक्यात जाऊन एसटी बसची पाहणी करेल. जाहिरातीच्या उत्पादकाचा तपशील घेतील. विनापरवाना कृत्य केल्यास त्याला दंड ठोठावणार आहे. राज्य एसटी महामंडळ ग्रामीण भागापर्यंत वाहतुकीची सेवा देते. हाच धागा पकडून फुकटे उत्पादक आपल्या उत्पादनाची जास्तीत जास्त माहिती पोहोचविण्यासाठी एसटी हाच एकमेव पर्याय मानतात. यामधून एसटी महामंडळाचे लाखोंचे नुकसान होते. बसमध्ये फक्त परवानगी घेतलेल्यांनाच जाहिराती लावण्याचा अधिकार आहे. त्यात शासनाच्या जाहिराती या योजनेची माहिती देण्यासाठी असतात. बसेसमध्ये जाहिराती लावण्यापूर्वी परवानगी बंधनकारक आहे. परंतु, आता कुठल्याही प्रकारची हयगय करण्यात येणार नाही, अशी माहिती आगार व्यवस्थापक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (स्थानिक प्रतिनिधी)