शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

होमगार्ड सेवकांना सावत्र वागणूक

By admin | Updated: May 6, 2015 01:24 IST

होमगार्डस उपपथक गोंडपिंपरी येथील होमगार्ड प्रभारी अधिकारी व पोंभुर्णा येथील ग्रामीण पलटन नायक अधिकारी ...

पोंभुर्णा : होमगार्डस उपपथक गोंडपिंपरी येथील होमगार्ड प्रभारी अधिकारी व पोंभुर्णा येथील ग्रामीण पलटन नायक अधिकारी यांनी आपल्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून स्वत:च्या आर्थिक स्वार्थासाठी मनमानीपणे कारभार करून होमगार्ड सैनिकांवर अन्याय करीत असून या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आहे.सन २०१४-१५ या कालावधीत आलेले सर्व बंंदोबस्त पलटन नायक अधिकारी विजय कुकडकर हे स्वत: गोंडपिंपरी येथे जाऊन गोंडपिपरी येथील होमगार्ड प्रभारी अधिकाऱ्याशी संगणमत करुन कोणत्या बंदोबस्तावर कोणकोणत्या होमगार्ड सैनिकांना पाठवायचे आणि तो बंदोबस्त किती दिवसाचा आहे, त्यासाठी त्यांच्याकडून किती पैसे घ्यायचे, हे ठरवितात. जो होमगार्ड त्यांनी ठरविल्याप्रमाणे पैसे देण्यास तयार असेल अथवा जवळचा नातेवाईक असेल त्यालाच आलटून पालटून बंदोबस्ताच्या ड्युट्या देत असल्याचा आरोप आहे. सदर होमगार्ड सैनिक त्यांना पैसे दिले तरी ते याबाबतची कुठेही वाच्यता करीत नाहीत. अशी त्यांना त्यांची पक्की खात्री झाली आहे. त्यांनाच लागोपाठ बंदोबस्ताच्या ड्युट्या कशा दिल्या जातात, याबाबत आम्ही होमगार्ड प्रभारी अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता त्यावर त्यांनी आम्ही जे करतो तेच बरोबर आहे, तुम्ही जास्तीची अरेरावी करु नका, तुम्हाला जे करावयाचे असेल ते तुम्ही करा, अधिकारी आमचे आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत जाऊनही तुम्ही आमचे काहीच बिघडवू करु शकत नाही. आम्ही सांगणार तेव्हाच तुम्हाला बंदोबस्ताच्या ड्युट्या मिळतील. आमच्या विरोधात वागाल तर तुम्हाला सेवेतून काढून टाकू, अशा धमक्या दिल्या जातात. त्यामुळे आम्ही होमगार्ड सैनिक दोन्ही अधिकाऱ्यांच्या धाकापोटी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत जावून शकत नाही, असे या होमगार्ड सैनिकांनी सांगितले. ग्रामीण पलटन नायब अधिकारी हे पद २० होमगार्डस् सैनिकांच्या बंदोबस्त ड्युटीवर एक पर्यवेक्षक म्हणून असताना कायद्याने उल्लंघन करून जो होमगार्ड सैनिक ठरल्याप्रमाणे त्यांना पैसे देईल किंवा त्यांच्या जवळच्या नात्यातील असेल अशा तीन सैनिकावरच तो अधिकारी म्हणून अवैधरित्या स्वत: ड्युटी करुन भत्ता कमावत आहे. यातून शासनाच्या पैशाची लुट करुन शासनाची फसवणूक करीत आहे व दुसऱ्या होमगार्ड सैनिकांना बंदोबस्त करण्याची संधी न देता त्यांना बंदोबस्ताच्या ड्युटीपासून वंचित ठेवतो. (तालुका प्रतिनिधी)