शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा प्रशासनाकडून सावत्रपणाची वागणूक

By admin | Updated: April 29, 2015 01:16 IST

जिवती तालुक्याच्या निर्मितीपूर्वी या तालुक्यातील नागरिक गेली अनेक वर्षे हालअपेष्टा सहन करीेत आयुष्य जगत होती.

जिवती : जिवती तालुक्याच्या निर्मितीपूर्वी या तालुक्यातील नागरिक गेली अनेक वर्षे हालअपेष्टा सहन करीेत आयुष्य जगत होती. तालुका निर्मितीनंतर यात फरक पडेल असे वाटत होते. मात्र तालुका झाल्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही. प्रशासन या तालुक्याला सावत्रपणाची वागणूक देत असल्याचे दिसून येत आहे. विकासात सर्वाधिक महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या रस्त्यांचीच संपूर्ण तालुक्यात दैना झाली आहे. या तालुक्यातील अर्ध्याही खेड्यात अजूनपर्यंत रस्तेच पोहचले नाहीत. यामुळेच संपूर्ण तालुक्याचा विकास खुंटला आहे.या तालुक्यातील डोंगरदऱ्यात वस्त्या करून नागरिक वास्तव्य करीत आहेत. पण अजूनही त्यांचे जीवनमान बदलले नाही. आहे त्याच स्थितीत उदरनिर्वाह करीत आहेत. जिवती तालुका आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखला जातो. आदिवासी व मागासलेला दुर्गम तालुका म्हणून येथे शासकीय कर्मचारीसुद्धा येण्यासाठी तयार नसतात. परिणामी विकासाला खीळ बसत आहे. ‘गाव तिथे रस्ता’ असे शासनाचे ब्रिद असताना मात्र येथील खेड्यात अजूनही बऱ्याचठिकाणी रस्ते पोहोचलेच नाहीत, ही शोकांतिका आहे. प्रत्येक गावाला रस्ता जोडला तर त्या गावाचा विकासही झपाट्याने होतो. पण इथे रस्ताही नाही आणि दळणवळणाचे साधनही नाही. एखाद्या रुग्णाला बैलबंडीवर टाकून रुग्णालयात न्यावे लागते. खडकी, रायपूर, शंकरलोधी, सोरेकसा, नोकवाडा, नारायणगुडा, धनकदेवी, महापांढरवाणी, भुरी येसापूर, लेंडीजाळा, कमलापूर अशा अनेक खेड्यात अद्याप रस्तेच नाहीत. खेड्यातच रस्ते नसतील तर तालुक्याचा विकास कसा होणार? असा गावकऱ्यांचा प्रश्न आहे. रस्ता नसल्याने दळणवळणाच्या सोयी नाहीत, अशा परिस्थितीत गावाचा विकास कसा होणा जनतेची कामे कशी होणार रुग्णांना चांगल्या आरोग्य सेवा कशा मिळणार या प्रश्नाचे उत्तर संबंधित प्रशासनानेच द्यावे, लोकप्रतिनिधींनाही याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. एकंदरीत रस्त्याअभावी संपूर्ण तालुक्याचाच विकास खुंटला आहे. (शहर प्रतिनिधी)