शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या पावसाने सोयाबीन पडले पिवळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 05:00 IST

मागील काही दिवसांपासून सूर्य नारायणाचे दर्शनसुद्धा झाले नाही. ढगाळी वातावरणामुळे पिकांवर परिणाम पडत असल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी केली जात आहे. अनेक गावांमध्ये अतिपावसामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीत पाणी घुसले. आहे. परिणामी सोयाबीन, तूर, कपाशी, मूग, उडीद यांसह भाजीपाला पिकांचेही नुकसान होत आहे.

ठळक मुद्देशेतकरी पुन्हा संकटात : आठ ते दहा दिवसांपासून सूर्यदर्शनच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील आठ ते दहा दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे खरीपातील पिकांचे नुकसान होत आहे. शेतात पाणी साचत असल्यामुळे पीक पिवळे पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.मागील काही दिवसांपासून सूर्य नारायणाचे दर्शनसुद्धा झाले नाही. ढगाळी वातावरणामुळे पिकांवर परिणाम पडत असल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी केली जात आहे. अनेक गावांमध्ये अतिपावसामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीत पाणी घुसले. आहे. परिणामी सोयाबीन, तूर, कपाशी, मूग, उडीद यांसह भाजीपाला पिकांचेही नुकसान होत आहे.जिल्ह्यात राजुरा, कोरपना, भद्रावती, जिवती वरोरा या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस तसेच सोयाबीनची पेरणी केली आहे. पीक जोमात असतानाच आता ढगाळी वातावरणामुळे पिकांवर विपरीत परिणाम पडत असल्याने नुकसानीची शक्यता व्यक्त केली जात आहे.सोयाबीन, कापूस उत्पादक संकटातयावर्षी खरीपातील पिके जोमाने आली. त्यामुळे भरघोस उत्पन्न होऊन पुढील वर्षाची चिंता मिटेल, अशी शेतकºयांची आशा असतानाच मागील आठ ते दहा दिवसांपासून ढगाळी वातावरण तसेच अधूनमधून पाऊसही कोसळत आहे. त्यामुळे आता पिके पिवळी पडत आहे. तर काही ठिकाणी शेतात पाणी जमा झाले आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच कापूस उत्पादक शेतकरी सध्या तरी संकटात सापडले आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती