शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर नगरपरिषदेचा गौरव

By admin | Updated: September 7, 2016 00:52 IST

स्वच्छ भारत अभियानात बल्लारपूर तालुका हागणदारीमुक्त म्हणून घोषित झाला आहे.

स्वच्छ भारत अभियान : अमिताभ बच्चन यांच्या हस्ते पुरस्कारबल्लारपूर : स्वच्छ भारत अभियानात बल्लारपूर तालुका हागणदारीमुक्त म्हणून घोषित झाला आहे. या पाठोपाठ बल्लारपूर नगरपालिकेने हागणदारीमुक्त अभियान व घनकचरा व्यवस्थापनात उल्लेखनीय कार्य करून स्वच्छ शहर, सुंदर शहर संकल्पना नागरिकांत रुजविली. त्याबद्दल राज्य शासनाच्या नगरविकास विभाग व एनडीटीव्ही यांच्या संयुक्त विद्यमाने नगराध्यक्ष छाया मडावी व मुख्याधिकारी विपीन मुद्धा यांना चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासह नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी नगराध्यक्ष मडावी व मुख्याधिकारी मुद्धा, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, न.प. गटनेते देवेंद्र आर्य यांना पुरस्कारादाखल स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि १ कोटी ५० लाख रुपयांचा धनादेश प्रदान केला.बल्लारपूर न.प.ला ‘ब’ वर्ग मिळालेला असून औद्योगिक शहर म्हणून ओळख निर्माण झाली आहे. स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद देत न.प. प्रशासनाने गेल्या तीन महिन्यांपासून स्वच्छ शहर, सुंदर शहर साकारण्यासाठी वॉर्डावॉर्डात गुड मॉर्निंग पथकाच्या माध्यमातून हागणदारीमुक्त शहर करण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पामुळे नागरिकांमध्ये जनजागृती झाली आहे. जागृतीमुळे उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांमध्ये संकोच भावना निर्माण होण्यास मदत झाली आहे. शहरातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन योग्य ठिकाणी करण्यात आल्याने परिसर स्वच्छ झाला आहे.स्वच्छता अभियानात नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्यासह उपाध्यक्ष संपत कोरडे, स्वच्छता सभापती विनोद उर्फ सिक्की यादव, विरोधी पक्ष गटनेते चंदनसिंह चंदेल, यांच्या सहकार्याने स्वच्छा भारत अभियान राबविले. प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली. (शहर प्रतिनिधी)