शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा

By admin | Updated: May 7, 2015 00:59 IST

चिमूर तालुक्यातील भिसी परिसरात जंगललगत असलेल्या शेतीला वन्यप्राण्यांपासून अतोनात नुकसान होत आहे.

चिमूर : चिमूर तालुक्यातील भिसी परिसरात जंगललगत असलेल्या शेतीला वन्यप्राण्यांपासून अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे पेरणीच्या हंगामापासून हजारो रुपयांची लागत शेतात लावून शेतकऱ्याच्या हातात काहीच मिळत नाही. त्यामुळे भिसी परिसरातील वन्यप्राण्यांचा वनविभागाने बंदोबस्त करून शेतकऱ्यांच्या पिकाला संरक्षण देण्याची मागणी जिल्हा परिषद चंद्रपूरचे गटनेते डॉ. सतिश वारजूकर यांनी केली.काँग्रेस कमेटी भिसीच्या वतीने आयोजित चिमूर तहसील कार्यालयासमोरील धरणे आंदोलन कार्यक्रमात सतिश वारजूकर बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती घनश्याम डुकरे, काँग्रेस कमेटी भिसी अध्यक्ष अरविंद रेवतकर, वननियंत्रण समिती अध्यक्ष मनोज गेडाम, सचिव किसन कुमले, उपाध्यक्ष देवानंद भीमटे, महिला तालुका काँग्रेस अध्यक्ष सुरेखा अथरगडे, जिल्हा उपाध्यक्षा लता अगडे, नागभीड काँग्रेस तालुका उपाध्यक्ष शिरीष वानखेडे, धनराज मालके, सरपंच रहेमान पठाण आदी उपस्थित होते.यावेळी सतिश वारजूकर पुढे म्हणाले, सर्वसामान्य जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवित सत्ता मिळविणाऱ्या भाजप सरकारला सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा दिसत नाही. धनदांडग्या व्यापाऱ्याच्या हिताचे धोरण राबवित शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. नुकसान भरपाई अर्धवटच देत शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीनला योग्य भाव न देता शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम शासनाकडून सुरू आहे. स्थानिक आमदार मात्र ‘आमदार आपल्या दारी’ या कार्यक्रमातून जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी गावोगावी फिरत असल्याचा देखावा करीत आहे. भिसी परिसरातील शेतकरी आपल्या समस्या सोडविण्यासाठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करतात. मात्र या समस्येकडे स्थानिक आमदार लक्ष देत नसून प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. येत्या पंधरा दिवसात भिसी परिसरातील समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वारजूकर यांनी दिला. त्यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदारमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी संगिता राठोड व प्रभारी तहसीलदार बोल्हेकर हे गैरहजर असल्याने नायब तहसीलदार येनगेंदलवार यांना निवेदन देण्यात आले. संचालन राजेंद्र मोहीतकर यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)