शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

चोरटी येथील नरभक्षक वाघाचा तत्काळ बंदोबस्त करा

By admin | Updated: July 10, 2017 00:24 IST

मागील फेब्रुवारी महिन्यापासून ब्रह्मपुरी तालुक्यातील गावामध्ये वाघाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेकांचे जीव गेले आहेत.

किसान क्रांती मोर्चा : आंदोलनाचा इशारालोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी: मागील फेब्रुवारी महिन्यापासून ब्रह्मपुरी तालुक्यातील गावामध्ये वाघाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. त्यामुळे त्या नरभक्षी वाघाला जेरबंद करा अन्यथा अंदोलन करण्याचा इशारा किसान क्रांती मोर्चाच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील मौजा हळदा, बोळधा, मुडझा, बल्लारपूर, कुडेसावली, पद्यामपूर, भूज, आवळगाव, कोसंबी, मुरपार, गायडोंगरे वायगाव व चोरटी परिसरात नरभक्षक वाघामुळे मोठ्या प्रमाणात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ७ जुलै ला ब्रह्मपुरी तालुक्यातील चोरटी या गावात दुपारी सहदेव पांडूरंग तलमले (५०) व नारायण शिवराम कांबळी (३५) यांचेवर वाघाने हल्ला करुन गंभीर जखमी केले. तसेच मागील दोन ते तीन महिन्याच्या कालावधीत अनेकांवर हल्ला करुन गंभीर जखमी केले आहे. तर अनेक जनावरांना आपले भक्ष्य बनवीले आहे. त्यामुळे नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी व वाघाच्या हल्ल्यातील मृत पावलेल्या व जखमी झालेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी परिसरातील हजारो लोकांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले होते, तसेच वनविभाग कार्यालयावर ठिय्या आंदोलन, मोर्चे, धरणे करुन वारंवार निवेदन दिलेले आहे. मात्र अजूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे नरभक्षक वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, तसेच वाघाच्या हल्यात जखमी झालेल्या चोरटी येथील ग्रामस्थांना आर्थिक मदत देण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशार किसान क्रांती मोर्चा समन्वय समितीच्या वतीने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकेर, उपवनसंरक्षक कुलराज सिंह यांना तहसीलदार विद्यासागर चव्हान यांच्या मार्फत देण्यात आले.या शिष्टमंडळात विनोद झोडगे, महेश पिलारे, मोंटू पिलारे, अतुल राऊत, नामदेव नखाते, अविनाश राऊत, सुधीर सेलोकर, मोरेश्वर उईके, शुभम पत्रे, नरेंद्र नरड उपस्थित होते.